महाराष्ट्र

CSW-70 च्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासाठी जागतिक चर्चासत्र; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: संयुक्त राष्ट्रांच्या Commission on the Status of Women (CSW-70) या जागतिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर “SDGs and Mitigation of VAW: Weaving Ways for Empowerment” या विषयावर १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता विशेष समांतर (Parallel Event) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री-आधार केंद्र, पुणे यांच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

महिला सक्षमीकरण, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) आणि महिलांवरील हिंसाचार (VAW) कमी करण्यासाठी आवश्यक धोरणे व उपाययोजना यावर या चर्चासत्रात सखोल चर्चा होणार आहे. स्त्री-आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक या लिंग, सामाजिक-आर्थिक, पुनरुत्पादक व हवामान विषयक अन्याय कमी करण्याबाबत मार्गदर्शन करतील. लोकसभा सदस्या डी. पुरंदेश्वरी या महिलांवरील हिंसाचार कमी करण्यासाठी सर्वोत्तम अर्थसंकल्पीय पद्धती व निर्भया योजनांचा आढावा मांडतील. तर ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षा सुरमा पाधी या महिलांना दर्जेदार आरोग्य, शिक्षण व संरक्षण मिळण्यासाठी कायदे बळकट करण्याची गरज स्पष्ट करतील.

राष्ट्रीय महिला चळवळीच्या अभ्यासक डॉ. पॅम राजपूत या CEDAW च्या संदर्भात पीडितांना न्यायप्रवेश वाढविणे व भेदभावमुक्त प्रणाली विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करतील. स्त्री-आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी संस्था व तिच्या कार्याचा आढावा देतील. क्षेत्रीय कार्यकर्त्या अंजु वाघमारे व लहानू आबनावे या क्षेत्रातील अनुभव मांडतील.

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे लिंगसमभावाधारित हिंसाचाराच्या संदर्भात पोलीस व न्यायव्यवस्थेच्या प्रशिक्षणावर भाष्य करतील. लंडनस्थित रेणूका फडके आर्थिक जागृतीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर तर महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे लिंगसमभाव व कुटुंबातील विविधतेच्या संदर्भातील उपक्रम मांडतील.या चर्चासत्रात डॉ. नीलम गोऱ्हे महिलांवरील विविध प्रकारच्या हिंसाचाराला तोंड देण्यासाठी व्यापक कायदेशीर सुधारणा आणि समावेशक न्यायव्यवस्था उभारण्याची गरज अधोरेखित करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा पाठक करणार असून आभार प्रदर्शन मुग्धा केसकर करतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

19 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago