मुख्य बातम्या

युद्धजन्य पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये एलपीजी-इंधन साठ्याचा आढावा; टंचाई नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जगभरातील विविध भागांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन शिरूर महसूल प्रशासनाने एलपीजी गॅस व इंधन साठ्याचा आढावा घेतला. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील एलपीजी गॅस वितरक, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.

बैठकीत तालुक्यातील घरगुती तसेच व्यावसायिक गॅस साठा, वितरण व्यवस्था, उपलब्धता आणि संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठीची तयारी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन, गॅस आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनावश्यक साठेबाजी किंवा पॅनिक बुकिंग होण्याची शक्यता असते, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले.

तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी वितरकांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, तालुक्यातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांपर्यंत वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने गॅस पोहोचला पाहिजे. वितरकांनी उपलब्ध साठ्याची अद्ययावत माहिती प्रशासनाला नियमित द्यावी तसेच पुरवठा साखळीत अडचण आल्यास तात्काळ कळवावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत घरगुती ग्राहकांच्या गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन एलपीजी सिलिंडरवर अवलंबून असल्याने गॅस पुरवठ्यात व्यत्यय आल्यास नागरिकांच्या स्वयंपाकघरावर थेट परिणाम होऊ शकतो. तसेच हॉटेल, खानावळी, मिठाई व्यवसाय, केटरिंग सेवा आदी व्यावसायिक घटकांची गरज लक्षात घेऊनही सुसूत्र नियोजन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने म्हणाले, “युद्धामुळे गॅस सिलिंडर किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. तालुक्यात सध्या पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक पॅनिक बुकिंग करू नये.”

दरम्यान, संकटकाळात अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार होऊ नये यासाठीही प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी, जादा दर आकारणी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांनी दिला.

एकूणच, संभाव्य संकटाची दखल घेत शिरूर प्रशासनाने आधीच खबरदारी घेतल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता गरजेनुसारच गॅसची मागणी करावी आणि कुठेही गैरप्रकार आढळल्यास प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

6 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

12 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

13 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

13 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

13 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

14 तास ago