महाराष्ट्र

वाल्हेकरवाडी, चिंचवड हद्दीत वाजवी किंमतीत व्यापारी गाळे घेण्याची सुवर्णसंधी

पुणे:​ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. 30 वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील Convenience Shopping Center मधील एकूण 31 व्यापारी गाळ्यांची 80 वर्षाकरिता भाडेपट्ट्याने ई-लिलाव पध्दतीने विक्री करण्यासाठी दि.14 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यापैकी तळमजल्यावर 7 व्यापारी गाळे असून त्याकरिता रु.87,100/- प्रति चौ.मी.तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 24 व्यापारी गाळे असून त्याकरिता रु.80,400/- प्रति चौ.मी. आधारभूत दर आहेत. पेठ क्र.30 येथील तळमजल्यावरील व्यापारी गाळ्यांचे कमीत कमी क्षेत्र 13.60 चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत रक्कम रु.11,84,560/- आहे. तर जास्तीत जास्त क्षेत्र 22.50 चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत रक्कम रु.19,59,750/- आहे.

इच्छुक व्यक्तींनी ई-लिलाव प्रक्रियेसंबंधीची सूचना, सविस्तर अटी व शर्ती यांच्या माहितीसाठी https://eauction.gov.in व www.pmrda.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता अर्जासोबत आधारभूत किंमतीच्या 10% अनामत रक्कमेचा डीडी कार्यालयास सादर करणेचे आहे. व्यापारी गाळे विकत घेण्याच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ करुन घ्यावा व मुदतीपूर्वी Online अर्ज सादर करावेत, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी – Helpline No.:- 022-27652934

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

5 तास ago

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

1 दिवस ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago