महाराष्ट्र

पोलीस भरतीची मोठी अपडेट

औरंगाबाद: राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले आहेत. मात्र काही ठिकाणाहून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत आम्ही १५ दिवसांनी वाढवून देत आहतो. उर्वरीत तक्रारी दूर करण्यासाठी हे जास्तीचे १५ दिवस देत आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नॉन क्रिमिलीयअरसाठी काय माहिती?

उमेदवारांना अर्ज भरताना नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मागील वर्षाचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र या वर्षी मिळतं. त्यामुळे मागील वर्षीचं हे प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. पोलीस भरतीसंदर्भातील ज्या काही मागण्या आहेत, त्या आम्ही मान्य केल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय होती अडचण?

राज्यात 18 हजार जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सर्व्हरवर लोड आल्याने ते डाऊन झाले आहेत. एक अर्ज सबमिट करण्यासाठी 4 ते 5 दिवस लागत आहेत. 30 नोव्हेंबर ही अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरण्यासाठीची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवल्याची माहिती दिली. त्यामुळे 15 डिसेंबर ही ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

1 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

1 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

2 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

4 दिवस ago

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

4 दिवस ago