महाराष्ट्र

पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा यांची रणनीती यशस्वी; जनतेने विकासाला कौल दिला; एकनाथ शिंदे

नवी दिल्ली: पंतप्रधान Narendra Modi यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची चाणक्य नीति पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेने विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यक्त केली.

शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि एनडीएच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच पश्चिम बंगालमध्ये एनडीएला मोठे यश मिळत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “पश्चिम बंगालमध्ये भय आणि भरोसा अशी लढाई होती. जनतेने भयाला नाकारत भरोशाला स्वीकारले. मोदीजींनी विकसित भारताचे स्वप्न जनतेसमोर ठेवले आणि देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या भूमिकेवर जनतेने विश्वास दाखवला आहे.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले. त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला आधुनिक राजकारणातील चाणक्य म्हणून सिद्ध केले आहे.”

डबल इंजिन सरकारमुळे पश्चिम बंगालमध्ये विकासाला वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले की, “उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या बाबतीत पश्चिम बंगाल आता नव्या दिशेने पुढे जाईल. राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळेल, नवीन कंपन्या येतील आणि विकासाचा मुख्य प्रवाह अधिक मजबूत होईल.”

यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. “जनतेने राष्ट्रहित आणि विकासाला पसंती दिली असून भ्रष्टाचार, दहशतवाद आणि गुंडाराजाच्या राजकारणाला नाकारले आहे. मोदीजींचे ‘नेशन फर्स्ट’ धोरण जनतेला मान्य झाले आहे,” असे शिंदे म्हणाले.

पश्चिम बंगालमधील भाजप नेते Suvendu Adhikari तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. “दहशतीसमोर न झुकता कार्यकर्त्यांनी सातत्याने संघर्ष केला. अनेकांनी लाठ्या-काठ्यांचा सामना केला, पण ते मागे हटले नाहीत. त्या मेहनतीमुळेच आजचा विजय दिसत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

10 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

11 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

11 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

11 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago