संभाजीनगर: भारतातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये लोक त्यांच्या मालमत्तांवरून भाड्याने देऊन चांगली कमाई करत आहेत. फक्त सामान्य नागरिकच नाही, तर मोठे सेलिब्रिटी देखील त्यांचे अपार्टमेंट्स, बंगले भाड्याने देऊन लाखोंमध्ये कमवत आहेत.
पण, थांबा.
तुम्ही मालमत्ता भाड्याने देत आहात ना
तर ‘1963 चा कायदा’ जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
भाडेकरू बनू शकतो मालक
होय 1963 च्या मर्यादा कायद्यानुसार, जर एखाद्या भाडेकरूने सलग 12 वर्षे कोणतीही अडथळा न येता मालमत्तेवर ताबा ठेवला आणि घरमालकाने त्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही, तर भाडेकरू त्या मालमत्तेवर मालकी हक्काचा दावा करू शकतो.
यालाच “प्रतिकूल ताबा” (Adverse Possession) असे म्हणतात.
कायद्यानुसार नेमकं काय घडत
मालकाने 12 वर्षे मालकी हक्क सांगितला नाही
भाडेकरूने तोपर्यंत ताबा कायम ठेवला
तर भाडेकरू मालकी मिळवू शकतो.
सरकारी मालमत्तेवर देखील हक्क
होय सरकारी मालमत्तेसाठी ही मुदत 30 वर्षांची आहे. जर एखादा व्यक्ती सरकारी जागेत 30 वर्षे सतत राहत असेल, तर तो त्या मालमत्तेवरही दावा ठोकू शकत.
घरमालकांनी काय करावे
भाडेकरूंसोबत लेखी करार करा
करारात भाडे व अटी स्पष्ट नमूद करा
वेळोवेळी मालमत्तेवर ताबा दाखवा
भाडेकरूने नियमभंग केला तर लगेचच कायदेशीर कारवाई करा.
तर मग उशीर कशाचा
तुमच्या मालमत्तेचं संरक्षण आजच सुरू करा! नाहीतर भाडेकरू तुमच्या घराचा “मालक” होईल.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…