महाराष्ट्र

रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो…

अयोध्या: रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक अशा राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो असल्याची प्रतिक्रिया महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अयोध्येतून व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोध्येत जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले आणि महाआरतीत देखील सहभाग घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निमंत्रणानंतर विखे पाटील काल अयोध्येकडे रवाना झाले होते. आज त्यांनी अयोध्येत राम मंदीराच्या सुरू असलेल्या काम पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत केली. मंदीर निर्माणातील कारागीर,स्थानिक नागरीक तसेच सुरक्षा रक्षकांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधून या सर्व कामातील बारकावे जाणून घेतले.

यासर्व पाहाणीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की आयोध्येत सर्वाच्या सोबतीने झालेले प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन आणि अनेक वर्षाची प्रतिक्षा असलेले राम मंदीर उभे राहात असल्याची पाहणी करत आली, यामुळे आपण कृतकृत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत राम मंदीर व्हावे ही कोट्यावधी रामभक्तांची इच्छा होती. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंदीर निर्माणाचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आणि समाधान असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की मंदीराचे काम अतिशय आखीव रेखीव पध्दतीने होत आहे प्रत्येक खांबावरील नक्षीकाम अतिशय सुबक आणि लक्ष वेधून घेणारे असल्याने प्रभू श्रीरामाचे मंदीर हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतिक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

8 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

22 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago