मुख्य बातम्या

रामलिंग महिला उन्नतीच्या पाठपुराव्याला अखेर यश…शिरुरच्या सुलभ शौचालयाचा ठेका रद्द

शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील एस टी (ST) आगारातील सुलभ शौचालयाच्या असुविधेबाबत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले यांनी गेल्या सहा महिन्यापासुन वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असुन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडुन ‘सुलभ इंटरनॅशनल’ चा करार रद्द करण्याची शिफारस व विनंती करण्यात आली आहे.

 

रामलिंगच्या सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले यांनी गेल्या सहा महिन्यापासुन शिरुर एस टी (ST) आगारातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयातील असुविधेबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता. तसेच दि १७ डिसेंबर २०२४ रोजी सुलभ शौचालय शिरुर येथील स्वच्छतेबाबत आणि महिला कामगार नसल्याबाबत तक्रार होती. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि ३ जानेवारी २०२५ उपोषणाचा इशाराही दिला होता.

 

त्यानंतर शिरुर येथील एस टी आगाराच्या व्यवस्थापक मनिषा गायकवाड यांनी राणी कर्डीले यांना उपोषण न करण्याबाबत विनंती करत ‘सुलभ इंटरनॅशनल’ च्या ढिसाळ कारभार सुरळीत करण्याबाबत दि १० जानेवारी २०२५ पर्यंत अवधी मागितला होता. त्यामुळे महामंडळाच्या विनंती मान देऊन कर्डीले यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले होते.

 

शिरुर येथील एस टी आगाराच्या व्यवस्थापक मनिषा गायकवाड यांनी दि ६ जानेवारी २०२५ रोजी मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे सदरचे सुलभ इंटरनॅशनल संस्था यांच्याकडून झालेल्या असुविधेबाबत पत्र लिहुन कळविण्यात आले होते. संदर्भित पत्रानुसार शिरुर येथील एस टी आगारातील बस स्थानक येथील ‘सुलभ इंटरनॅशनल’ चा करार रद्द करण्याची शिफारस व विनंती करण्यात आली आहे.

 

त्यामुळे सदरचा करार रद्द करून नव्याने नेमणुक करणेबाबत त्वरित कारवाई करण्यात येईल तसेच रा प प्रचलित नियमानुसार कामकाज करून घेण्यात येईल असे पत्र शिरुर येथील एस टी आगाराच्या व्यवस्थापक मनिषा गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले यांना दिले आहे. त्यामुळे लवकरच शिरुर एस टी आगारातील सुलभ शौचालयाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास कर्डीले यांनी व्यक्त केला आहे.

शिरूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचा बंद ला उस्फुर्त प्रतिसाद!

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद

रांजणगाव पोलिसांनी कारेगावातील कोयता गँग’ च्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago