मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्कॉर्मशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकमत वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटी रुपये निधी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशाप्रकारे निधी मागण्यासाठी मी कुणाला पत्रही लिहिले नाही असे स्पष्टीकरण त्यांनी सभागृहात दिले. दरम्यान माझ्या मतदारसंघाला नियमानुसार जवळपास २० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र काही वृत्तपत्र या संदर्भातील चुकीच्या माहिती दिल्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे मत त्यांनी सभागृहात मांडले
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले की, मला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे वृत्त प्रसारित होत आहे मात्र यात काहीही तथ्य नाही. पुरवणी मागण्यांमध्ये मला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला हा गैरसमज आहे हे आकडे खरे नाहीत
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…