मुंबई: महाविकास आघाडी सरकारने व्हॅटच्या किमती कमी करून गॅसची किंमत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न करून उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेला दिलासा देतील का? असा थेट प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात केला. आमदार जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार राज्यातील गॅस दरवाढ व वीज प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
मागील वर्षभरात केंद्रसरकारने गॅस दरात सहा वेळा वाढ केली. व्यावसायिक गॅसचा भाव २११९ वर गेला तर घरगुती सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर गेली आहे. त्यामुळे घरोघरी चुली ही मागणी महाराष्ट्राची जनता आता करेल अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
विधानसभेचे अधिवेशन होईपर्यंत कृषी पंपांची वीजजोडणी तोडू नये, अशा सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना आधीच वीजजोडण्या मिळत नाहीत. आता उपलब्ध असलेले कनेक्शन तोडण्याचे काम होत आहे. त्यामुळे राज्यातील कृषीपंपांची ४६ हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्यसरकारने तात्काळ माफ करावी, अशी आग्रही मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…