चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार; सरकारवर शेतकरी, कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचारावरून हल्लाबोल

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. राज्य सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असून दुष्काळ, शेतकरी, महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि अमली पदार्थांच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला.

शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी राज्यात सुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याची भूमिका मांडली. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर “५६ टक्के कमिशन सरकार” असल्याचा आरोप करत कंत्राटदारांची एक लाख कोटी रुपयांहून अधिक बिले प्रलंबित असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत महिला अत्याचार आणि अमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणांवर सरकारला धारेवर धरले. तर जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांच्या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी सरकार टिंगल-टवाळी करत असल्याची टीका केली.

जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार नसल्याने चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणे योग्य नसल्याचे सांगत महाविकास आघाडीने बहिष्काराचा निर्णय घेतला. पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविणार असल्याचा इशाराही आघाडीच्या नेत्यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महायुती सरकारची विक्रमी कामगिरी; विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण…

2 तास ago

महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिवेशनात विधेयक शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक…

4 तास ago

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; ग्रॅच्युईटी, वेतनवाढ आणि ५ हजार नव्या बसांचा निर्णय

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीने…

4 तास ago

जेसीबीच्या काचा फोडून १० हजारांची रोकड लंपास; चोरी की वैयक्तिक वाद

शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड…

18 तास ago

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…

2 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

2 दिवस ago