मुख्य बातम्या

धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड करत वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस निरीक्षक यांनी या आरोपीकडुन पैसे घेऊन सोडून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून याची वाचा फोडण्यासाठी त्याच पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या ‘खत्री ‘ पोलिस कर्मचाऱ्याने याबाबत वरिष्ठांना लेखी तक्रार अर्ज केला आहे. जर पोलीस अधिकारीच खुनाच्या गुन्हयातील आरोपीला पैसे घेऊन सोडून देत असेल तर मग सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळणार…? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबतची सविस्तर माहीती अशी की, शिक्रापुर पोलिस स्टेशनमधील अ.म.र.नं. ३१/२०२४ मधील मयताचा खुन झालेला होता. त्यातील खुनाचे आरोपी शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी निष्पन्न करुन आर्थिक प्रलोभनास बळी पडुन आरोपी सोडुन दिलेले आहेत अशी लेखी तक्रार त्याच पोलिस स्टेशनमधील एका ‘ खत्री ‘ कर्मचाऱ्याने लेखी निवेदनाद्वारे वरीष्ठांकडे दिली आहे.

 

याबाबत त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी शिकापुर पोलीस स्टेशन मधील सी.सी.टी.व्ही. चित्रीकरण डिलीट केले. तसेच ज्या दुय्यम सरकारी वाहनातुन आरोपीस पोलीस स्टेशन येथे आणले त्या वाहनाचे लॉगबुक चोरीस गेले. त्यानंतर त्यांनी सदर चौकशीची कागदपत्रे माहिती अधिकार अतंर्गत मागणी केली असता माहीती देण्यास नाकारण्यात आली.

 

त्याचबरोबर कोरेगाव भिमा येथील एक गरीब अल्पवयीन १३ वर्षे वयाची मुक बधीर निर्भया हिचे कडुन तिच्या आईशी दिपरतन गायकवाड हे संगनमत करुन तिच्याकरवी आर्थिक लाभाकरीता देहविक्रीचा व्यवसाय चालवित आहेत. याबाबत अपर पोलीस अधीक्षक,पुणे विभाग यांना समक्ष भेटुन ‘खत्री’ या कर्मचाऱ्याने सांगितले असता त्यावेळी त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन ” मग तु इथे कशाला आला आहे, डी. वाय. एस. पी. कडे जा.” असे म्हणुन तेथुन सदरचा अर्ज घेवुन त्यांना पाठवुन दिले.

 

त्यामुळे जर वरीष्ठांच्या भष्ट्राचाराची भांडाभोड करुनही वरीष्ठ अधिकारी न्याय देणार नसेल तर याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणी गंभीरपणे लक्ष देऊन या खुनाचा प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन खुनातील आरोपी निष्पन्न करुन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली गेली पाहिजे. अन्यथा कायद्याचे हे रक्षक मोठे भक्षक बनल्याशिवाय राहणार नाही. आता या प्रकरणी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ खत्री ‘ पोलिस कर्मचाऱ्याचा वरीष्ठ सन्मान करणार की त्यांचा डीफॉल्ट रीपोर्ट पाठवून पोलिस मुख्यालयात बदली करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(क्रमश:)

रामलिंग महिला उन्नतीच्या पाठपुराव्याला अखेर यश…शिरुरच्या सुलभ शौचालयाचा ठेका रद्द

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद

शिरूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचा बंद ला उस्फुर्त प्रतिसाद!

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

12 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

12 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

13 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

13 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

18 तास ago