मुंबई: केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांच्या भावना गौरवण्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा सन्मान आहे. विमानात सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत उद्घोषणा केली जाते, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच विमानातून मराठीची उद्घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात, मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूरसह इतर शहरात येणाऱ्या विमानांमध्ये मराठीतून उद्घोषणा करण्यात यावी, यामुळे मराठी भाषेच्या संवर्धन व प्रसाराला चालना मिळेल तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना मराठी संस्कृती व भाषेची ओळख होईल, असे पटोले यांनी म्हटले आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…