महाराष्ट्र

मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

 

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. हा मोर्चा पहिल्या मोर्च्यापेक्षा पाच पट मोठा असेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे, जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान यावर आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ

असं आहे की, त्यांचं ठीक आहे, त्यांची मागणी होती, मराठा समाजाला आरक्षण द्या, ते दिल्या गेले आहे. मराठा समाजाला दहा टक्क आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण आम्ही टिकवणार असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खरं म्हणजे तो प्रश्न संपलेला आहे. मग कशासाठी हा आग्रह? हे कळण्याच्या पलिकडचं आहे, असा हल्लाबोल भुजबळ यांनी यावेळी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बाकीच्या काही गोष्टी आहे त्यावर आपण विचार केला पाहिजे. सारथी, बार्टी, महाज्योती या सारख्या संस्था आहेत. ज्या गोष्टी सारथीच्या माध्यमातून मिळतात त्यातील अनेक गोष्टी महाज्योतीच्या वाट्याला आलेल्या नाहीते. म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो, ओबीसीची संख्या मोठी आहे, त्यांना किमान समान वागणूक द्या. विद्यार्थ्यांना हे कळत नाही की पैसे कोण देतं? आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून पैसे येतात, विद्यार्थ्यांना एवढंच माहिती असतं की सरकार पैसे देतं, मात्र आम्ही या गोष्टी विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत. मग त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो, त्याला देतात मग मला का देत नाही, असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.

मुख्य सचिवांनी याच्यात लक्ष देऊन सर्वांना समान वागणूक कशी मिळेल ते बघावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. चांगलं काम चाललेलं आहे. मराठी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. पावसामध्ये, गणपती उत्सवामध्ये हे काय करणार आहे? मला काही कळत नाही. लोकांना का त्रास देतायेत? त्यांचं जर हेच म्हणणं असेल की ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, तर चार आयोगांनी आरक्षण नाकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टानेही फार मोठा जजमेंट दिलेलं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago