महाराष्ट्र

सत्यानाश होईल साल्यांचा, ठाकरे गट सोडणाऱ्यांवर बडा नेता संतापला

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्य तसेच स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचे राजकारण जोर धरू लागले आहे.

काही ठिकाणी तर स्थानिक पदाधिकारी ही निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी आग्रही आहेत. तर राज्यपातळीवरील नेते महापालिका, जिल्हा परिषदा हातातून जाऊ नयेत म्हणून ताकद असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात बोलवून घेत आहेत. गेल्या काही दिवसांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. असे असतानाच ठाकरेंच्या पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी फुटून गेलेल्यांचा सत्यानाश होईल. बाळासाहेबांनी मोठं केलं तरी साले फुटतात, असा थेट हल्लाबोल केलाय.

चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत खैरे (23 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिक शिवसंपर्क मोहिमेच्या पूर्वतयारी शिबिरात बोलत होते. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी जोरदार बॅटिंग केली. फुटून गेलेल्या साल्यांचा सत्यानाश होईल, असं म्हणत खैरेंनी बंड केलेल्या आणि पक्ष सोडून सात असलेल्यांप्रती संताप व्यक्त केला. बाळासाहेबांनी मोठे केले तरी साले फक्त पैशांसाठी फुटतात. यांचा सत्यनास होईल…सत्यनास…आम्ही तर प्लॅनिंग केले आहे की एका एकाला कसे पाडायचे? त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला.

अंबादास दानवे यांचे केले तोंडभरून कौतुक

पक्षातील अंतर्गत शिस्त कशी असावी, यावरही त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. पक्षात कडक शिस्त पाहिजे. नाहीतर मी आणि अंबादास म्हणजे घर की मुर्गी दाल बराबर, अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाहेरच्या नेत्याने शिस्त लावली की मग ऐकतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे अंबादास दानवे यांचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले. जिल्ह्यात आज आपली अशी परिस्थिती आहे की आमदार, खासदार आपल्याकडे नाही. पण धडाडीचे विरोधी पक्षनेता आहे.अंबादासने विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम केले आहे .मी पण त्याला अनेक वेळा कसे काम करायचे हे सांगत होतो. अधिकाऱ्यांवरदेखील त्याने चांगला वचक ठेवला, अशी स्तुती खैरे यांनी केली.

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का

दरम्यान, एकीकडे ठाकरे गटाचे शिवसंपर्क मोहीम पूर्वतयारी शिबीर चालू असताना दुसरीकडे याच शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. येथे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकीकडे खैरे पक्ष सोडून गेलेल्यांना पाडण्याची भाषा करत असतानाच दुसरकीकडे माजी महापौरानेच सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आता संभाजीनगरच्या राजकारणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

10 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

15 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

15 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

16 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

16 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

17 तास ago