महाराष्ट्र

मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका; अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण

मुंबई: मराठीचे वैभव जगासमोर आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मराठी मूड’ चॅनलतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा प्रभादेवी, मुंबई येथील पु.ल.देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला. २१ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झालेल्या या स्पर्धेत अवघ्या एका आठवड्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक येथून स्पर्धक सहभागी झालेच; शिवाय भारताबाहेरूनही पाकिस्तान आणि दुबईसह जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

“मराठी माझ्यासाठी काय आहे?” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत वय वर्षे ५ पासून ते ६५ वर्षांच्या आजींपर्यंत अनेकांनी कविता, कथाकथन, गाणी आणि स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून आपले विचार मांडले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि परीक्षक म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिक व बालकवी एकनाथ आव्हाड आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर नील साळेकर (Just Neel Things) यांची खास उपस्थिती होती. अभिनेत्री संजना पाटील यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. संपुर्ण कार्यक्रम marathimood या युट्यूब चॅनल वर उपलब्ध होणार आहे.

बालगट, शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट अशा चार गटांतील सादरीकरणांच्या व्हिडिओंचे परीक्षण करून परीक्षकांनी अंतिम १६ विजेत्यांची घोषणा केली. गटानुसार घोषित विजेत्यांची नावे ‘मराठी मूड’ यूट्यूब चॅनलवर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी जाहीर होणार आहेत.

मराठी भाषेसाठी असे कार्यक्रम सतत होत राहिले पाहिजेत आणि ‘बोला मराठी’ या उपक्रमामुळे मराठी भाषेला जागतिक मंच उपलब्ध होत आहे, यासाठी संजय जाधव यांनी ‘मराठी मूड’चे अभिनंदन केले.

छोटे चॅनल असूनही मराठी भाषेसाठी मोठे पाऊल उचलून ते कमी कालावधीत यशस्वी केल्याबद्दल बालकवी एकनाथ आव्हाड यांनी कौतुक केले.

नव्या मराठी पिढीला मराठीचे बाळकडू पाजण्याचे काम ‘मराठी मूड’ करत आहे, असे कौतुक जस्ट नील नील साळेकर यांनी केले.

परीक्षकांनी दिलेल्या गुणांप्रमाणे चारही गटांतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असे अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धेतील सहभागी पर्शियन बीता आणि पाकिस्तानी जहानवी यांना ‘मराठी मूड’तर्फे २५ हजार रुपयांचा विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

पुढील वर्षी आणखी भव्य नियोजन: बोला मराठी उपक्रमाद्वारे स्वयंस्फुर्तीने मराठी बोलण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. अवघ्या ७ दिवसांच्या तयारीनंतरही मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. पुढच्या वर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या स्तरावर राबवला जाईल,” अशी माहिती ‘मराठी मूड’चे चॅनल हेड शंतनु जोशी यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

8 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

9 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

10 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

15 तास ago