महाराष्ट्र

कामगार कल्याणकारी योजना राबवणारी भारतातील आदर्श नुसी कामगार संघटना

मुंबई: समाजात कामगार कल्याणकारी योजना राबवणारी न्यूसी एक चांगली कामगार संघटना असून, भारतातील कामगार संघटनाना आदर्श असणारे नुसी हे मॉडेल आहे. असे स्पष्ट उद् गार महाराष्ट्र हिंदू सभेचे जनरल सेक्रेटरी साथी संजय वढावकर यांनी जाहीर सभेत काढले.

नुसि या कामगार संघटनेतर्फे दरवर्षी ९ मे ला “नुसी फाउंडेशन डे “साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशन डे बरोबरच हिंद मजदुर सभेचा अमृत महोत्सव देखील ९ मे २०२३ रोजी मस्जिद बंदर येथे साजरा करण्यात आला. आपल्या मार्गदर्शक भाषणात संजय वढावकर यांनी फाउंडेशन डे च्या शुभेच्छा देऊन सांगितले की, नाविकांच्या भविष्य निर्वाह निधीचा १०० कोटीचा घोटाळा झाला होता ,ते पैसे सरकारकडून मिळाले नव्हते. त्यावेळी नुसिचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. शांती पटेल यांच्या बरोबर हिंद मजदुर सभेतर्फे शरद पवार यांच्याशी संपर्क साधून नाविकांचे १०० कोटी रुपये परत मिळाले. हिंद मजूर सभा ही सरकार, मालक व राजकीय पक्षापासून अलिप्त अशी एकमेव कामगार संघटना आहे. भारतीय रेल्वे कामगारांनी जर रेल्वे बंद केली तर, केंद्र सरकार कामगार विरोधी असलेले चार लेबर कोड बील ताबडतोब मागे घेईल, असे मला वाटते.

नॅशनल रेल्वेमेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी साथी वेणू नायर यांनी आपल्या तुफान व तडाखेबाज भाषणाने नाविकांची मने जिंकून प्रचंड टाळ्या घेतल्या. त्यांनी नुसीच्या फाउंडेशन डे ला शुभेच्छा देऊन सांगितले की, आपली संघटना अतिशय चांगल्या प्रकारे कामगार व कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबवित आहे, याचा मला आनंद वाटतो. भारतात २० कोटी बेरोजगार आहेत. कायम कामगारांची संख्या कमी होत असून, कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यास आम्ही रेल्वे उद्योगात कडाडून विरोध करीत आहोत. केंद्र सरकारचा रेल्वे उद्योग विकण्याचा विचार असून तो आम्ही कामगारांच्या लाल झेंड्यानी हणून पाडला आहे. रेल्वेचे १२ लाख कामगार असून रेल्वेत ५८ प्रकारच्या सवलती आहेत. मुख्यमंत्र्यांनी रेल्वेत प्रवास करून रेल्वे ही प्रवाशांसाठी सुरक्षित आहे, असे सांगितले याचा आम्हाला आनंद वाटतो.

नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की. दीड लाख नाविक कामगार न्यूसीचे सभासद आहेत. नुसीने आपल्या कामगार, कुटुंब व मुलांसाठी अनेक शैक्षणिक व कल्याणकारी योजना राबवित असून, स्कॉलरशिप दिली जाते. गरजू कुटुंबाना आर्थिक सहाय्य केले जाते. नुसीची लवकरच वाराणसी येथे शाखा उघडली जाईल. गोव्यात देखील आपण लवकरच हॉस्पिटल सुरू करणार आहोत. नुसी स्किल सपोर्ट यापुढेही चालू ठेवणार आहोत. नूसीतर्फे ” सागरीका ” हे मुखपत्र काढले असून, हे कामगारांचे व्यासपीठ असून त्यामध्ये कामगार आपले लेख, कविता लिहू शकतात. मेरीटाईम युनियन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी तुषार प्रधान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पूर्वीच्या नेत्यांनी समाजासाठी व राष्ट्रासाठी खूप काम केले. भांडवलदाराविरुद्ध कामगार संघटनांनी एकत्र लढले पाहिजे. नूसी आणि एमयुआय यापुढेही एकत्र काम करीत राहणार. कॅप्टन राजेश टंडन यांनी नाविक कामगारांना फाउंडेशन डे च्या शुभेच्छा दिल्या. मोहम्मद इब्राहिम सेरंग यांचे नातू अब्दुल रहमान यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मोहम्मद सेरंग यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत नूसीच्या स्थापनेपासूनचा संघर्षमय इतिहास सांगितला.

सभेचे सुंदर सूत्रसंचालन नुसीचे पदाधिकारी सुनील नायर यांनी केले तर आभार लुईस गोम्स यांनी मानले. याप्रसंगी पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेतले. सभेला नाविक कामगार व त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मारुती विश्वासराव

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

51 मिनिटे ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

9 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago