महाराष्ट्र

मुंबईत राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीला गती

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. मुंबईस्थित कोल्हापूरकरांची गेल्या ५० वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन विधान भवनात उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली.

स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करून त्याबाबत तत्काळ मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र देण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. तसेच स्मारक उभारणीसाठी उपसभापती सचिन अहिर यांनी पुढाकार घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, अजय चौधरी, सुनील शिंदे, राजेंद्र यड्रावकर, चंद्रदीप नरके तसेच कोल्हापूर जिल्हा फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष सूर्यकांत कडाकणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

“राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी पुढाकार घेण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे,” अशी भावना उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी आता समन्वय समितीच्या माध्यमातून हालचाली सुरू झाल्याने मुंबईतील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

7 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago