CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
सोलापूर : राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू बाबा मनोहर मामा भोसले प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून कथितरित्या जमा झालेल्या पैशांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिस तपासातून समोर आला आहे. या प्रकरणात करमाळ्यातील दत्तकला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, मनोहर मामा भोसले याच्याकडून आलेल्या पैशांची विल्हेवाट लावणे तसेच विविध मार्गांनी त्यांची गुंतवणूक करण्याच्या व्यवहारांमध्ये झोळ दाम्पत्याची भूमिका असल्याचा संशय आहे. या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
शिक्षण क्षेत्राशी आर्थिक कनेक्शन?
मनोहर मामा भोसले याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार शिक्षण संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले होते का, याचा तपास आता केला जात आहे. या प्रकरणामुळे भोसले याचे शिक्षण क्षेत्रातील काही व्यक्तींशी आर्थिक संबंध आहेत का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. कथितरित्या मिळवलेल्या पैशांचा वापर नेमका कुठे करण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.
करमाळा आणि कुर्डूवाडी पोलिसांचा तपास
करमाळा आणि कुर्डूवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा संयुक्त तपास सुरू असल्याची माहिती आहे. झोळ दाम्पत्याकडून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांसह मनोहर भोसलेशी त्यांचे नेमके संबंध काय होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? आर्थिक व्यवहारांचे जाळे किती मोठे आहे? तसेच कथितरित्या मिळालेल्या पैशांची गुंतवणूक कुठे करण्यात आली? या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
कोण आहे मनोहर मामा भोसले?
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा रहिवासी असलेला मनोहर भोसले हा काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्य जीवन जगत होता. डी.एड. परीक्षेत अपयश आल्यानंतर त्याने आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह केल्याचे सांगितले जाते.
काही काळानंतर तो पुन्हा गावात परतला. आपण संत बाळूमामा यांच्या आशीर्वादाने कार्य करत असल्याचा दावा त्याने केला. त्यानंतर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याच्याकडे भक्तांची गर्दी होऊ लागली. हळूहळू महाराष्ट्रासह परराज्यांतूनही भाविक त्याच्याकडे येऊ लागल्याचे सांगितले जाते.
काळाच्या ओघात मनोहर भोसले ‘मनोहर मामा’ म्हणून प्रसिद्ध झाला. करमाळा आणि गाणगापूर येथे त्याच्याशी संबंधित मठ असल्याची माहिती आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याचे सांगितले जाते.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील काही व्यक्तींसोबत मनोहर मामा याचे फोटोही सोशल मीडियावर यापूर्वी चर्चेत आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती नेमकी किती आहे, याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच या आर्थिक व्यवहारांमागील नेमकी वस्तुस्थिती आणि संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे.
मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने…
मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे.…
मुंबई: २२व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक…
मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र…
मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या सलग घटनांनी रेल्वे…
मुंबई: लावणी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली कला. तिच्या ठेक्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे, शब्दांत लोकजीवन आहे…