महाराष्ट्र

माझ हरवलेल पोरग 8 वर्षांनी सापडल, बघताच आईने मिठीत घेतल अन्…

बीड: काही क्षण हे शब्दात मांडण्याच्या पलीकडचे असतात. अश्रूंमध्ये साठवलेल्या आठवणी, हृदयात दडलेली आस आणि काळजाच्या एका कोपऱ्यात जपलेली शेवटची आशा. हे सगळं आज एका क्षणात खरं ठरलं आहे, जेव्हा 2017 पासून हरवलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर आपल्या आई-वडिलांच्या मिठीत परत आला. हे शक्य झालं बीड पोलिसांच्या सततच्या प्रयत्नातून आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर.. “आम्ही फक्त नातं पुन्हा जुळवून दिलं.”

2017 मध्ये हरवला होता मुलगा 

2017 मध्ये हरवलेला तो मुलगा तेव्हा अवघ्या 16 वर्षांचा होता. घरातून बाहेर पडल्यावर तो पुन्हा परतलाच नाही.

आई-वडिलांनी कळजावर दगड ठेवला

शोधाशोध झाली, रात्रंदिवस डोळ्यात आसवांच्या धारांसह त्याची वाट पाहणाऱ्या आई-वडिलांची आशाही मावळली. त्यांनी काळजावर दगड ठेवत त्याला गमावल्याचं मान्य केलं, पण मन कुठे मान्य करतंय.

अखेर हरवलेला पोरगा सापडला 

या प्रकरणाचा धागा पकडत बीड पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या शोधाला सुरुवात केली. अनेक तांत्रिक तपास, चौकशा, आणि शंभरहून अधिक तुकड्यांना एकत्र करून अखेर त्यांनी त्या हरवलेल्या पोराचा थांगपत्ता लावला.

आईने लगेच मुलाला मिठीत घेतल

तो क्षण अवर्णनीय होता जेव्हा त्या आई-वडिलांसमोर त्यांच्या “मृत” समजल्या गेलेल्या मुलाने जिवंतपणे उभं राहत हात पसरवले. एका क्षणात आईने त्याला मिठीत घेतलं, वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, आणि तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले.

कुटुंबाच्या आयुष्यात पोलिसांमुळे आनंद परतला 

पोलिसांनी केवळ एक गुन्हा उघडकीस आणला नाही, तर एका कुटुंबाच्या जीवनात पुन्हा प्रकाश फुलवला.

आईचं लेकरु परत आल

आयुष्यभर न विसरता येणाऱ्या या भेटीत, फक्त मुलगाच नव्हे, तर नातंही परत आलं.. जिवंत, श्वास घेणारं आणि प्रेमाने ओथंबलेलं.

बीड पोलिसांचं सर्वत्र कौतुक 

बीड पोलिसांच्या या संवेदनशील कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी खरं तर फक्त एक शोध नव्हे, तर एका हताश आईच्या काळजाला “माझं पोरगं परत आलं…” हे सांगण्याची संधी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

8 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

8 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

9 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

9 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

9 तास ago