महाराष्ट्र

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला बाधा आणणारा असल्याचे म्हटले आहे.

तांबे म्हणाले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठीच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड तसेच मार्गावरील अनेक ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा ठरणारा प्रकल्प होता. या रेल्वेमुळे पुणे शहरावरील वाहतूक आणि लोकसंख्येचा ताण कमी होण्यास मदत झाली असती. मात्र हा सरळ आणि सोपा प्रकल्प अधिक गुंतागुंतीचा करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

या निर्णयामागे राजकीय कारणे किंवा अन्य कोणते हितसंबंध आहेत का, असा सवाल उपस्थित करत तांबे यांनी रेल्वे प्रकल्प हे दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने आखले जातात, असे नमूद केले. आज घेतलेला चुकीचा निर्णय भविष्यातील पिढ्यांच्या विकासावर परिणाम करणारा ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी या विषयावर तज्ज्ञ समिती नेमून मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

नाशिकच्या औद्योगिक, आयटी आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनीही या प्रश्नाचे गांभीर्य ओळखावे, असे आवाहन केले. तसेच सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, खेड आणि मार्गावरील इतर भागांतील नागरिकांनी जनआंदोलन उभारावे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदार-खासदारांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. जनतेचा आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून सर्वांनी एकत्र येऊन या निर्णयाविरोधात लढा उभारला पाहिजे, असे तांबे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago