मुख्य बातम्या

गुनाटमधील वाळूच्या Video मुळे प्रशासनाची धावपळ; पंचनामा झाला, पण गुन्हा दाखल होणार का…?

शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा व्हिडीओ ‘www.shirurtaluka.com’ ने प्रसिद्ध केल्यानंतर गुरुवारी (ता. १८) उशिरा त्याचा पंचनामा करण्यात आला. मात्र, ही कारवाई प्रशासनाच्या जागरुकतेमुळे नव्हे, तर ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या शोध पत्रकारीतेमुळे झाली आहे.

गुनाट मध्ये सरकारी गायरान जमीन गट क्रं 101 मध्ये लाखो रुपयांचा अवैध वाळूसाठा असताना महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणा झोपा काढत होत्या का…? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. गुनाट येथील ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवर मागील दिड महिन्यांपासून हा अवैध वाळू साठा करण्यात आला होता.

या प्रकरणाची धक्कादायक बाब म्हणजे, सरकारी मालकीच्या जागेवर दिवसाढवळ्या वाळूचे ढिगारे उभे राहत होते, ट्रॅक्टर आणि डंपरची ये-जा सुरु होती, वाळूची विक्री होत होती; तरीही कोणत्याही यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. अखेर ‘www.shirurtaluka.com’ च्या अधिकृत इंस्टाग्रामच्या अकाउंटवर प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र प्रशासनात खळबळ उडाली आणि संबंधित विभागांची धावपळ सुरु झाली.

कारवाई कोण करणार…? जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न…?
अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, यावरुन महसूल विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनात दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते. कारवाई कोण करणार…? पंचनामा कोण करणार…? यावरच तासन्‌तास चर्चा सुरू होती. अखेर सायंकाळी महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचारीही आले आणि उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या वाळूचे प्रमाण किती ब्रास आहे, याबाबतची माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. जर कारवाई पारदर्शक असेल, तर वाळूचे प्रमाण जाहीर करण्यास नेमका आक्षेप काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

लाखोंची उलाढाल; पण आरोपी कोण…?
या ठिकाणी मागील दिड महिन्यांपासून वाळूचा साठा करून त्याची राजरोसपणे विक्री होत होती. सरकारी मालमत्तेचा वापर करुन लाखो रुपयांची उलाढाल करण्यात आली. मात्र या साठ्यामागे नेमका कोण आहे, याबाबत प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे. ग्रामस्थांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू साठवून विक्री करणे हे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटमागे कोणाचा वरदहस्त होता…? स्थानिक पातळीवरील कोणत्या घटकांचे संरक्षण मिळत होते…? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

पंचनामा झाला, आता गुन्हा कधी…?
प्रशासनाने वाळू जप्त करुन आपले कर्तव्य पुर्ण केल्याचे दाखवले असले, तरी खरा प्रश्न अद्याप कायम आहे. अवैध वाळू साठवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का…? सरकारी जमिनीचा बेकायदेशीर वापर करुन शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांवर कारवाई होणार का…? की हा पंचनामा फक्त कागदोपत्री राहणार…? ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, केवळ वाळू जप्त करुन उपयोग नाही. या संपूर्ण प्रकरणातील सुत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अन्यथा ही कारवाई केवळ दिखावा ठरेल आणि वाळूमाफियांचे धाडस आणखी वाढेल.

प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरचं थेट प्रश्नचिन्ह…?
“सरकारी गायरान जमिनीवर दिड महिना वाळूचा व्यवसाय सुरु होता, मग प्रशासन झोपले होते का…?” हा प्रश्न आता गुनाटसह परिसरातील नागरिक विचारत आहेत. पंचनामा झाला, वाळू जप्त झाली; मात्र या अवैध व्यवसायाचे खरे सूत्रधार कोण…? त्यांना संरक्षण कोणी दिले आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार, याची उत्तरे प्रशासनाला द्यावीच लागणार आहेत. कारण गुनाटमध्ये जप्त झाली ती केवळ वाळू नाही, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उभे राहिलेले अनेक प्रश्नही आहेत.

Video! सर्कल ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर वाळू माफियांचा ‘रात्रीचा खेळ’; प्रशासन मौन, कारवाई कधी?

घोड धरणात अवैध वाळू उपसा; कारवाईच्या नावाखाली आर्थिक तडजोडींचा संशय…? 

शिरूर! घोड धरणात सहा वेळा बोटी फोडूनही वाळू माफिया मोकाटच; दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु…

Video: ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा दणका; महसुल विभागाने वाळूच्या बोटी फोडल्या…

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago