महाराष्ट्र

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा जिंकेल, असा विश्वास

मुंबई : शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली. “रक्ताचं नातं सांगून किंवा सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही, शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस आहेत,” असे म्हणत त्यांनी उबाठा गटावर निशाणा साधला.

शिंदे म्हणाले, “काही लोक भुंकत आहेत, पण कुत्री झुंडीने येतात तर वाघ एकटा येतो. कुत्रे भुंकतात आणि वाघ शिकार करतो. ही शिवसेना आहे, हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, “बाळासाहेब फक्त नावात नसून विचारात आणि कामात असले पाहिजेत. खुर्चीसाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना जनता ओळखते.” शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे दोनदा फोडली गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्व क्षेत्रांत प्रगती केल्याचे सांगत शिवसेनेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिंदे यांनी त्यांना “भस्मासूर” अशी उपमा दिली.

चार वर्षांपूर्वीच्या शिवसेना उठावाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, जनतेने त्या निर्णयाला स्वीकारले असून आज राज्यभर शिवसेनेचे भगवे वर्चस्व वाढत आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाने ६० आमदार निवडून आणले असून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व वाढल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत महायुतीचा क्लीन स्वीप होईल – शिंदे

आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती सर्व १७ जागा जिंकेल आणि विरोधकांची पाटी कोरी राहील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्तम समन्वय असल्याचे सांगत त्यांनी महायुती अभेद्य असल्याचा दावा केला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर लोक शिवसेनेत प्रवेश करत असून “शहर ते गाव, फक्त शिवसेनेचेच नाव” हेच पुढील लक्ष्य असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago