मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीने काढल्याचे सांगितले जात असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांना फेटाळत पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून अंजली दमानिया यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अंजली दमानिया यांच्या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, “अंजली दमानिया यांच्या आजच्या विधानांमधून समाजात किती खालच्या पातळीची विकृती असू शकते, हे स्पष्ट होते. कपोल-कल्पित गोष्टी सांगून एखाद्या व्यक्तीची आणि कुटुंबाची सतत बदनामी करणे ही त्यांची सवय झाली आहे.”
चाकणकर यांनी यापूर्वी दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा उल्लेख करत, त्यापैकी एकही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नसल्याचे सांगितले. “आज त्या अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करत आहेत. संबंधित कुटुंबाने आपला घरातील व्यक्ती गमावला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र शोक व्यक्त करत असताना, मुलावरच वडिलांच्या घातपाताचा आरोप करणे हे नीच पातळीचे आणि किळसवाणे आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
खारगे समितीचा अधिकृत अहवाल येण्याआधी तसेच विमान अपघाताचा तपास सुरू असताना कोणताही पुरावा न देता अशी विधाने केली जात असल्याचा आरोपही रूपाली चाकणकर यांनी केला. “सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा हा घाणेरडा प्रयत्न आहे,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, अंजली दमानिया यांच्या या आरोपांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …