महाराष्ट्र

धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर…

ठाणे: शुक्रवार (दि. २६) ऑगस्ट २०२२ रोजी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त, ठाणे महानगरपालिका, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खा.डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा प्लॅटिनम हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी सलग ३० दिवस मोफत ई.सी.जी,२डी-इको, अँन्जीओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी यासाहित हृदयरोग संबंधी विविध मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

हे सलग ३० दिवसीय महाआरोग्य शिबीर आज शुक्रवार (दि. २६ ऑगस्ट ते दि.२६ सप्टेंबर २०२२) पर्यंत दररोज सकाळी १० ते संध्या ५ या वेळेत धर्मवीर आनंद दिघे साहेब हार्ट केअर सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे सुरु राहणार आहे.

तरी, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी ३० दिवस विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि प्लॅटिनम हॉस्पिटल, ठाणे यांनी केले आहे. वेळेअभावी नोंदणी न करू शकल्यास थेट शिबीर स्थळी केसपेपर काढून तपासणी करता येईल, अशी माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

16 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

18 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

22 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

1 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago