औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात काढण्यात आलेला मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले. तसेच महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आल्या आहेत. तसेच एका शौचालयावर असलेल्या बोर्डची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील मोर्चा काढल्याने पोलिसांनी 12 आयोजकांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी तेलंगणाचे आ. राजासिंह ठाकूर ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानपुरा परिसरातील महानगरपालीकेच्या मालकीच्या भिंतीला लावण्यात आलेल्या लोखंडी पत्र्याच्या पाटीवरील औरंगाबाद नाव तोडून आणि लोखंडी पाटी तोडून टाकून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एन-1 मधील सिडको चौकात स्मार्ट सीटीच्या अंतर्गत लावण्यात आलेला ‘लव औरंगाबाद’ नावाच्या बोर्डची तोडफोड करुन सार्वजनीक मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान केल्याप्रकरणी 7 ते 8 महिला आणि पुरुष यांच्याविरुद्ध एम.आय.डी.सी. सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदू जनगर्जना मोर्चाची रॅली आणि सभा संपल्यावर परत जाताना जमावातील काही लोकांनी निराला बाजार भागातील ॲक्सिस बँकेची काच फोडल्या, स्टेप ऑफ डान्स अकॅडमी औरंगाबाद नावाचे बॅनर व निराला बाजार भागातील इतर बॅनर फाडून दगडफेक करुन सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळ महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्मार्ट सिटी बस (क्र. MH 20 EL 3866) ही प्रवासी घेऊन सिडको बस स्टँड ते मध्यवर्ती बस स्थानक येथे जात होती. दरम्यान यावेळी नामांतराच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चातील जमावातील 15 ते 20 लोकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बसवर दगडफेक करून बसचे समोरील काच फोडली. तसेच खाजगी रिक्षा (क्र. MH 20 DC 4474 ) च्या टपावरील कपडा फाडून नुकसान केले. या प्रकरणी15 ते 20 लोकांवर वेदांतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…