aamdabad-tree
शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा उपक्रम राबवत आमदाबाद येथील युवा वकील अॅड. ऋतिक भास्कर थोरात यांनी आपल्या 27व्या वाढदिवसानिमित्त गावात 27 वृक्षांची लागवड केली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे गावकऱ्यांसह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
आमदाबाद गावातील मुख्य रस्त्यालगत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अॅड. ऋतिक थोरात यांच्या सहकाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वृक्षारोपणासोबतच या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी गावातील तरुणांनी एक महत्त्वाचा संकल्प केला. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किमान एक तरी झाड लावण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे भविष्यात गावातील परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होईल तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी युवकांचा सहभाग वाढेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अॅड. ऋतिक थोरात यांनी यावेळी बोलताना, “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी आहे. झाडे ही भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा असून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास गावातील माजी सरपंच बबनराव भिमाजी थोरात, माजी सरपंच योगेश थोरात, युवा कार्यकर्ते मंगेश थोरात, दीपक थोरात, सुदर्शन थोरात, प्रफुल्ल सोनवणे, धैर्यशील थोरात, सत्यशील थोरात, अॅड. सौरभ वाव्हळ, लक्ष्मणजी पवार तसेच शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
गावातील युवकांनी पुढाकार घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम राबवल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस सामूहिकरित्या साजरा…
सागरआप्पा दंडवते यांचा अनोखा वाढदिवस साजरा : १५,००० वह्यांचे वाटप व गुणवंतांचा गौरव
शिरुरच्या सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त माहेरच्या करुणालय शाखेत अन्नदान
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शिंगाडवाडी शाळेस पुस्तके भेट!
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…
मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २…
मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे…
मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17…