महाराष्ट्र

रेल्वेप्रवासी महिलां सुरक्षेसाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात; नीलमताई गोऱ्हे

मुंबई: महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे, अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती मा ना डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले.

रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा या  विषयाच्या अनुषंगाने विधानभवनातील सभाकक्षात संबधित अधिकाऱ्यांची  बैठक घेण्यात आली. त्यावेळी या बैठकीत मागील बैठकात दिलेल्या निर्देशावर कोणती अंमलबजावणी झाली याची माहिती घेतली. त्याप्रसंगी डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी  तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढील निर्देश दिले. ट्रेनमधे क्युआर कोड सिस्टम असावी,सुरक्षा गार्ड ची असलेली कमतरता पूर्ण करणेबाबत पाठपुरावा करावा, निर्भया फंड रेल्वे पोलिस यांना उपलब्ध करावा.

शासकीय पीडितासाठी त्यांच्या शारिरिक  उपचारानंतरही उपलब्ध झाल्यास मनोधैर्य वाढवण्यास मदत होईल, तसेच बेकायदेशीर व्यक्ती, गर्दुले लोकांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, सामाजिक संस्थाच्या प्रश्नाबाबत काय अंमलबजावणी केली ती त्यांना बैठकीत समजावे म्हणून अहवाल तयार करावा, दक्षता समिती महिला व महिला सुरक्षा कर्मचारी यांचे वॉट्सअप ग्रुप करावेत.

तसेच विशिष्ट वेळेनुसार स्वयंसेवी प्रवासी महिलांचे  वॉट्सअप ग्रुप करावेत, दक्षता समिती सदस्याच्या लोकेशनबाबत डैशबोर्ड तयार करावेत, मनोधैर्य योजनेचे प्रस्ताव तयार करावा. स्ननदा मातांसाठी हिरकणी कक्ष रेलवे-स्टेशनवर करावा. महिलांचे डब्यामध्ये ऑटोमॅटिक सेनेटरी नॅपकीन मशीन आणि चेंजिंग रूम असावी. रेल्वे स्टेशन व रेल्वेतील सीसी टिव्हिचे ऑनलाईन मानिटरिंग व्हावे, असे निर्देश  दिले.

महिला प्रतिनिधींनी  डार्क स्पॉट्स आणि सिग्नल ला अपघात घडतात त्याबाबत सूचना केल्या त्याबाबत मदत करावी, तसेच एस्केलेटर चढत असताना साध्यापायऱ्या विनाआधार असतील त्या दुरुस्त कराव्या या संबंधी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले रेल्वे पोलिसांचे संबंधित प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी तातडीने सहकार्य करावे, असे निर्देश  महाराष्ट्र गृहविभाग  प्रधान सचिव डॉ प्रज्ञा सरवदे  यांना दिले. तसेच रेल्वे प्रवाशांचा फटका  मारून दुखापत व लुट करणाऱ्या  फटका गॅगवर नियंत्रण  आणल्याबद्दल रेल्वे पोलीसाचे अभिनंदनही केले.

रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा या  विषयाच्या अनुषंगाने मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी १८ जून, २०१९, रोजी (ठाणे -कळवा स्थानकादरम्यान धावत्या लोकलच्या महिला डब्यावर दारुची रिकामी बाटली फेकल्याने दोन महिला प्रवासी जखमी झाल्याबाबत) १३ नोव्हेंबर, २०१९, ७ जुलै, २०२१ रोजी रेल्वे मधील महिला सुरक्षीततेबाबत बैठका घेतल्या होत्या. तसेच (दि. १५) जून, २०२३ रोजी मस्जीद बंदर जवळ धावत्या लोकलमध्ये झालेल्या अत्याचाराबाबत बैठका घेतल्या होत्या.

या विषयावर निर्देशानुसार बाबवार केलेल्या कार्यवाहीची माहिती घेण्यात आली. या बैठकीस  प्रधान सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई. डॉ प्रज्ञा सरवदे अतिरिक्त पोलिस महासंचालक रेल्वे सुरक्षा, मुंबई डॉ शिसवे पोलीस आयुक्त, (रेल्वे) मुंबई शुक्ला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे, मुंबई मा विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते. तसेच महिला दक्षता समितीच्या व सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधीची उपस्थित होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

2 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

4 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

4 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

4 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

5 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

6 दिवस ago