महाराष्ट्र

राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या; शिवेंद्रसिंहराजे भोंसले         

मुंबई: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांच्या दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

मंत्रालयात पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस अप्पर मुख्य सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, रस्ते विभागाचे सचिव श्री. संजय दशपुते, बांधकाम विभागाचे सचिव श्री. आबासाहेब नागरगोजे, उपसचिव प्रज्ञा वाळके, उपसचिव निरंजन तेलंग यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात नवीन रस्त्यांची कामे करताना वाहतूक रहदारीचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. विशेषतः डोंगराळ भागातील तसेच जास्त पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रांतील रस्त्यांच्या बांधणीत दर्जेदार व टिकाऊ कामे होण्यासाठी ठराविक पॅरामीटर्स निश्चित करून रस्त्यांचे आयुष्यमान वाढेल अशी कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरांना व जिल्ह्यांना जोडणारे रस्ते या पद्धतीने विकसित करावेत, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.

पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाढत्या वाहतूक वर्दळीचा विचार करता शहरालगतची सर्व रेल्वे स्थानके, विमानतळ, द्रुतगती मार्ग यांना जोडणारे मुख्य रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत. यासाठी अधिकारी स्तरावर समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील प्रमुख महामार्ग व रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे व प्रसाधनगृह केंद्रांची उभारणी करण्यासह पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हायब्रीड अ‍ॅन्युटी (HAM) टप्पा-३ अंतर्गत १०,००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून ही कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले.तसेच नाशिक परिक्रमा मार्ग, पुणे–शिरूर उन्नत मार्ग, हडपसर–यवत मार्ग, तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग आदी महामार्गांच्या कामांचा आढावा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला.

राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत प्रस्तावित रोपवे प्रकल्पांच्या कामकाजाचाही आढावा यावेळीते घेण्यात आला व या कामांना चालना देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच भीमाशंकर ते कर्जत या नवीन रस्त्याच्या आखणीबद्दल व या रस्त्याच्या बांधकाम नियोजचासुद्धा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago