महाराष्ट्र

खासगी शिकवणी केंद्रांवर आता कायद्याचा लगाम; शासनाकडून प्रारूप मसुदा जाहीर

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी आणि नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने पाऊल टाकले आहे. ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ या प्रस्तावित कायद्याचा प्रारूप मसुदा शासनाने तयार केला असून, त्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत.

हा मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना आपल्या सूचना व हरकती ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. ॲनी बेझंट रोड, पुणे-४११००१ किंवा शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, डॉ. ॲनी बेझंट रोड, पुणे-४११००१ यांच्याकडे सादर करता येणार आहेत.

केंद्र सरकारने १६ जानेवारी २०२४ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांसह देशातील विविध राज्यांमधील संबंधित कायदे व नियमांचा अभ्यास करून हा प्रारूप मसुदा तयार करण्यात आला आहे.

प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व हरकतींची छाननी करून त्यावरील अभिप्रायासह एकत्रित अहवाल २० सप्टेंबर २०२६ पर्यंत शासनास सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्राप्त अभिप्रायांचा विचार करून प्रारूप मसुद्यात आवश्यक बदल करण्यात येतील आणि कायदा अंतिम करण्याची प्रक्रिया पुढे राबविण्यात येणार आहे.उपसचिव समीर सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

3 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

3 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

7 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

7 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

7 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

7 तास ago