bhimashankar-mandir

श्रीक्षेत्र भीमाशंकरसह 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू…

महाराष्ट्र

पुणे : पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकरसह 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे भाविकांनी असभ्य, तोकडे आणि अशोभनीय कपडे घालून मंदिरात प्रवेश टाळावा, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यातील 528 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

शाळा, न्यायालये आणि डॉक्टरांसाठीही वस्त्रसंहिता आहे. त्याच धरतीवर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असून, याद्वारे थेट बंदी न घालता भाविकांची जागृती करण्यात येईल. पुणे जिल्ह्यातील ग्रामदैवत कसबा गणपती, चतुःश्रुंगी, जेजुरीचे खंडोबा मंदिर, भुलेश्वर महादेव, क्षेत्र कानिफनाथ गड, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, बनेश्वर महादेव, नरसापूर यासह विविध 71 मंदिरात ही वस्त्रसहिंता लागू करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामदैवत कसबा गणपती, चतुःश्रुंगी, जेजुरीचे खंडोबा मंदिर, भुलेश्वर महादेव, क्षेत्र कानिफनाथ गड, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, बनेश्वर महादेव, नरसापूर यासह विविध 71 मंदिरात ही वस्त्रसहिंता लागू करण्यात आली आहे.

Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…

शिर्डीच्या साई मंदिरात आता ‘नो मास्क नो दर्शन’

छत्रपती संभाजीनगरातील मंदिरात ड्रेसकोड लागू होणार?