hanuman-shree-ram

Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…

देश मुख्य बातम्या

चंदीगड (हरियाणा) : अयोध्येमध्ये राम मंदिराचे लोकार्पण सोमवारी (ता. २२) झाले आहे. राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान झाल्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी रामलिलाचे आयोजनही करण्यात आले. भिवानीमध्ये रामलिला सुरू असतानाच हनुमानाची भूमिका करणाऱ्याचा मृत्यू झाला असून, संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हनुमानाची भूमिका करत असलेल्या हरीश मेहता यांना स्टेजवरच हृदयविकाराचा धक्का बसला. पण, उपस्थितांना नेमकं काय झाले हेच समजले नाही. नाटकातील हनुमानाने प्रभू श्रीरामांच्या चरणी प्राण सोडल्याची माहिती परिसरात समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

भिवानी शहरामध्ये जवाहर चौकात एका सामाजिक संस्थेने या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. गाण्याच्या माध्यमातून राजतिलकची तयारी सुरू होती. गाणं संपले आणि त्यानंतर हनुमानाची भूमिका साकारलेले हरीश मेहता मंचावर आले आणि ते श्रीरामांची भूमिका करणाऱ्यांना चरणस्पर्श करण्यासाठी वाकले. श्रीरामांसमोर झुकल्यानंतर हरीश मेहता तिथेच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. रामलिलामध्ये हनुमानाला श्रीरामांच्या चरणांची पूजा करायची होती, त्यामुळे प्रेक्षकांना बराच वेळ हरीश मेहता पूजा करत आहेत, असेच वाटले. मंचावर उपस्थित असलेल्यांनी हरीश मेहता यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाहीत, यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत्यू झालेले हरीश मेहता वीज विभागात जेईच्या पदावरून निवृत्त झाले होते. गेल्या 25 वर्षांपासून ते हनुमानाची भूमिका साकारत होते.

अहमदनगरमधील बोअरवेलच्या अजब घटनेचा VIDEO Viral…

Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…

Video: दुचाकीवर कोंबड्या, श्वानासह किती जण बसलेत मोजाच…

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…