संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेनं (RBI) परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्याने काल मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून बँक सर्व बँकिंग व्यवहार बंद केले आहे.
बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर, महाराष्ट्र सहकारी संस्था निबंधकांना बँकेचा लिक्विडेशन सुरु करून एक लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार
लिक्विडेशन प्रक्रियेनंतर, प्रत्येक ठेवीदाराला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीसीसी) कडून पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीच्या विम्याचा दाव्याचा लाभ मिळवता येईल. ३ एप्रिल २०२५ पर्यंत, डीआयसीसीसीने २७५.२२ कोटी रुपये भरले आहेत, आणि ९१.५५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या पूर्ण रक्कमेचा दावा करण्याचा हक्क आहे.
डिपॉझिट इन्शुरन्स क्लेम प्रक्रिया (DICGC Claim Process)
1) डीपॉझिट इन्शुरन्स ही स्वयंचलित प्रक्रिया आहे. जेव्हा बँकेचा परवाना रद्द होतो, तेव्हा लिक्विडेटर DICGC ला ठेवीदारांची यादी पाठवतो.
2) तुमच्या खात्याची पुष्टी केली जाते लिक्विडेटर सर्व खातेदारांची तपशीलवार माहिती DICGC ला देतो:
नाव
खाते क्रमांक
ठेव रक्कम
KYC दस्तऐवज (जसे की आधार, पॅन कार्ड)
3) DICGC कडून पैसे पाठवले जातात* – एकदा खात्याची पडताळणी झाली की, ९० दिवसांच्या आत ₹५ लाखांपर्यंतची रक्कम संबंधित खातेदाराच्या दुसऱ्या खात्यात थेट जमा केली जाते.
4) जर तुमचं KYC पूर्ण नसेल* तर तुम्हाला लिक्विडेटरशी संपर्क करून KYC अपडेट करावी लागेल.
कुठे संपर्क करावा?
बँकेच्या मुख्य शाखेशी / लिक्विडेटरशी संपर्क करा
तुमचं KYC पूर्ण आहे का, याची खात्री करा
तुमचा दुसऱ्या बँकेचा खाते क्रमांक द्या (ज्यामध्ये रक्कम ट्रान्सफर होऊ शकेल).
महत्त्वाचं
तुम्हाला कोठेही धावपळ करण्याची गरज नाही
सगळी प्रक्रिया DICGC व लिक्विडेटर मार्फत पार पडते
तुमचं फक्त KYC अपडेट असणं आवश्यक आहे.
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…