Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक…

रांजणगाव गणपती (सुनील जिते) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी बुधवार (दि २३) रोजी निमगाव भोगी परीसरात ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी डॉ कोल्हे यांनी दुषित पाण्याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन सोडण्यात येणाऱ्या दुषित पाण्यामुळे आसपासच्या गावांतील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलच्या पाण्यात निकेल, कॅडमिअम, लीड यांसारखे धोकादायक घटक मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे येथील जलस्रोत पुर्णपणे खराब झाले आहेत.

 

MEPL कंपनीच्या या बेजबाबदार कारभारामुळे अण्णापुर, निमगाव भोगी, कारेगाव, फलकेमळा, सरदवाडी, ढोकसांगवी अशा अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे, शेतीच्या पाण्याचे जलस्रोत प्रदूषित झाले असून यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्यामुळे अनेक गावांतील नागरिकांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

 

देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार हे बुधवार (दि २३) रोजी रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीला भेट देऊन पाहणी करणार होते. परंतु काही कारणास्तव शरद पवार यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे शरद पवार यांच्याच सुचनेनुसार खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी निमगाव भोगी याठिकाणी भेट देऊन त्या परीसराची पाहणी केली.

 

यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना खासदार डॉ कोल्हे खालील सूचना दिल्या

 

१) प्रदुषण नियंत्रण महामंडळाने MEPL कंपनीतुन बाहेर पडणाऱ्या पाण्याची तपासणी करावी. तसेच, या सांडपाण्यावर बाहेर पडण्यापूर्वी काय प्रक्रिया करण्यात येते याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा.

 

२) कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून परिसरातील मृदेच्या गुणवत्तेचा अहवाल तयार करावा.

 

३) MEPL च्या बेजबाबदारपणामुळे नापीक झालेल्या जमिनींचे पुनरुज्जीवन कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव तयार करणे व याची जबाबदारी MEPL ने घेणे.

 

४) शिरुर पंचायत समितीच्या माध्यमातून प्रदूषणामुळे मृत झालेले जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करणे.

 

यावेळी माजी आमदार अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक संभाजी भुजबळ, निमगाव भोगीच्या सरपंच ज्योती सांबारे, निमगाव सोसायटीचे अध्यक्ष उत्तम व्यवहारे, माजी सरपंच अंकुश इचके, हिलिंग लाईव्ह चे समन्वयक संतोष सांबारे, धर्मराज रासकर, लक्ष्मण सांबारे, दिपक राऊत, सचिन सांबारे, केशव शिंदे, महेश रासकर, स्वप्नील वीर यासंह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

 

तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे, उपअभियंता मिलिंद कासार,गटविकास अधिकारी महेश डोके, नायब तहसिलदार विनय कोलवलकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषि अधिकारी सतिश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, नारायणगाव येथील कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश यादव, निमगाव भोगीच्या ग्रामपंचायत अधिकारी के. एम. गवळी, ढोकसांगवीचे ग्रामपंचायत अधिकारी सदानंद फडतरे आदी यावेळी उपस्थित होते.

 

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योगांना निर्बंध असूनही ही कंपनी रासायनिक प्रक्रिया उद्योग करत आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनीला नेहमीच क्लीन चीट दिली जात आहे. याबाबत माझा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असून माझ्या जीवाभावाच्या माणसांना या जीवघेण्या संकटातून मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

डॉ अमोल कोल्हे 

खासदार, शिरुर लोकसभा 

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; कहीं खुशी, कहीं गम

मलठणमध्ये भीषण अपघात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक अपघातस्थळावरून फरा

अण्णापूरमध्

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago