महाराष्ट्र

मालवणी टाऊनशिप शाळेत खाजगी संस्थेद्वारे अपात्र शिक्षकांची भरती; आमदार अस्लम शेख

पालिकेच्या शाळेत टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ! आमदार अस्लम शेख

नागपूर: मालाड पश्चिम मधील ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या’ ‘मालवणी टाऊनशिप शाळेत’ खाजगी संस्थेमार्फत अपात्र शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळखंडोबा सुरु आहे, असा गंभीर आरोप मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला.

शेख पुढे म्हणाले की, पालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या सीबीएसई बोर्डाच्या वर्गांतील टीईटी परीक्षा उत्तीर्ण पात्र शिक्षकांच्या सक्तीने व मनमानी पद्धतीने बदल्या केल्या गेल्या व तिथे खाजगी संस्थेद्वारे अपात्र शिक्षकांची भरती करण्यात आली. कालांतराने ६ वी ते ८वी व ९वी १०वी चे वर्ग देखील खाजगी संस्थेस देण्यात आले. खाजगी संस्थेने टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु केला. केंद्राचा शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा (R.T.E) व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करुन ही भरती संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली.

२०१३ पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे.

सर्वोच्या न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत शेख म्हणाले, सर्वोच न्यायालयाच्या एका आदेशानुसार १५ वर्षांपासून सेवेत असलेल्या शिक्षकांना देखील टीईटी अनिवार्य केलेली आहे. जर शिक्षक निर्धारित वेळेत टीईटी उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर त्याला निवृत्त करण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहे.

शिक्षणाच्या अधिकारांतर्गत (R.T.E.) प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी निकष व पात्रता स्पष्ट केलेल्या आहेत. असे असताना देखील ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भरती प्रक्रिया पालिकेच्या धोरणानुसार झाली आहे, पालकांमधील गैरसमज दूर झालेले आहेत, असे आपल्या उत्तरात स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही आमदार अस्लम शेख यांनी टीईटीचा मुद्दा लावून धरला.

मंगलप्रभात लोढा यांनी चर्चेत हस्तक्षेप करत आमदार अस्लम शेख यांच्यावर राजकीय टीकेचा सुर आळवला. मात्र टीईटीच्या बाबतीत कोणतीच भूमिका मांडली नाही. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रश्न शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचे सांगत मंत्री दादा भूसे यांच्याकडे वळता केला. मंत्री दादा भूसे यांनी केंद्राचा कायदा व न्यायालयाचा आदेशाच्या अनुषंगाने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

5 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

12 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago