महाराष्ट्र

सुर्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळा दूर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने जलपुरवठा सुरू होणार

मुंबई: मीरा–भाईंदर शहराच्या जलपुरवठ्याशी संबंधित सुर्या उपसा जलयोजना (टप्पा–२) मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला असून, मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महानगरपालिकेला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांसोबत विस्तृत चर्चा केली.

बैठकीस मीरा–भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल नांदुरकर, MMRDA चे अधीक्षक अभियंता चेतन बेंबाळे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता अजय आठवले, तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संदिप नलावडे आदी अधिकारी उपस्थित होते.

सध्याचा ३३ केव्ही वीजपुरवठा अपुरा

सुर्या जलयोजनेतील पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेला वीजदाब उपलब्ध न झाल्याने पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत होता.

आता १३२ केव्ही वीजपुरवठ्यास मान्यता

महापारेषणने सुर्या जलयोजनेसाठी १३२ केव्ही उच्च-दाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास तांत्रिक संमती दिली आहे. हा वीजपुरवठा दिवा मार्गे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या १३२ केव्ही पारेषण प्रणालीद्वारे मिळणार आहे. या नव्या वीजपुरवठ्यामुळे पंपांची कार्यक्षमता १००% होईल, योजनेंतील २१८ लाख लिटर (MLD) पाणी पूर्ण क्षमतेने उचलणे शक्य होईल, तसेच मीरा–भाईंदर शहराला नियोजित, स्थिर आणि वाढीव जलपुरवठा मिळणार आहे.

ट्रान्सफॉर्मर उभारणी कामांना वेग

नव्या पारेषण लाईन व ट्रान्सफॉर्मरची उभारणी सध्या वेगाने सुरू असून, सर्व कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उर्वरित कामे देखील मार्च २०२६ अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत.

मिरा – भाईंदर शहरासाठी महत्त्वाचा टप्पा

नवीन वीजपुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मीरा–भाईंदरचा जलपुरवठा नियमित, सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजांस अनुरूप राहणार आहे. शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुर्या जलयोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

2 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

2 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

2 तास ago