शिरूर तालुका

शिरूर! दोन वेळा उपनगराध्यक्ष तरीही प्रभागाचा नाही विकास; ऐश्वर्या पाचर्णे यांच्या प्रचाराला मोठी गती…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत रंगतदार झाली असून, प्रत्येक पक्षांकडून जोरदार ताकद लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली आहे. आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या थेट मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रचार जोमात सुरू असून तरुण, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेल्या एका उमेदवाराने दोन वेळा उपनगराध्यक्ष पद भूषवूनही स्वतःच्या प्रभागाचा विकास न केल्याची टीका जनतेतून होत आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज समस्या, गटारांच्या तक्रारी आणि मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रभागातील प्रश्न निकाली न लागता असतानाच त्यांनी तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

याउलट, ऐश्वर्या पाचर्णे यांच्या प्रचार बैठकींना प्रचंड गर्दी होत असून शहराच्या सर्व भागातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रलंबित कामे, जलव्यवस्था, स्वच्छता, स्मार्ट रस्ते, महिला संरक्षण, क्रीडा-सांस्कृतिक विकास आणि तरुणांसाठी रोजगार संधी यांसारख्या विषयांवर त्यांची ठोस भूमिका असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रचारादरम्यान ऐश्वर्या पाचर्णे म्हणाल्या, “शिरूर शहराचा सर्वांगीण विकास हा एकमेव ध्यास आहे. गेल्या काही वर्षांत प्रलंबित राहिलेल्या योजनांना गती देऊन शहराला आधुनिकतेकडे नेणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

शिरूरच्या राजकारणात नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी मिळावी या मागणीला वेग येत असून पंचरंगी लढतीत ऐश्वर्या पाचर्णे या निर्णायक स्पर्धक ठरत आहेत. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक चुरशीचा होण्याचे संकेत मिळत आहेत.

शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण…

शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून…

शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच कोलमडली…

शिरूर! पंचायत समिती पदासाठी एकत्रचा नारा पण उमेदवार काही ठरेना…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago