महाराष्ट्र

वांद्र्यातील त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी रहिवाशी रस्त्यावर उतरणार…

२८ फेब्रुवारीला उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुंबई: वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमध्ये उच्च न्यायालयाच्या उभारणीसाठी बांधकामे हटविण्यात येत आहेत. या ठिकाणी त्रिरत्न बुध्द विहार असून या विहाराच्या बचावासाठी स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आहेत. बुध्द विहारासाठी शासकीय वसाहतीमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

बुध्द विहार बचावासाठी त्रिरत्न बुध्द विहार बचाव कृती समितीने वांद्रे पूर्व,शास्त्रीनगर येथील कुशिनारा बुद्ध विहार येथे स्थानिक बौद्ध समाज बांधव व हितचिंतक यांची एक बैठक आयोजित केली. या बैठकीचे अध्यक्षस्थान एस. बी. जाधव यांनी भूषविले. यावेळी प्रज्ञा सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी शासकीय वसाहतीमधील त्रिरत्न बुध्द विहार वाचविण्याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले की, समता सेवा संघ गृहनिर्माण सोसायटीच्या झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात शासनाने नोटीस बजावली आहे. मात्र अद्याप त्रिरत्न बुद्ध विहारास कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. या संदर्भात वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे कार्य सुरू असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

तसेच समाज बांधवांनी त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी एकत्र येऊन लढा उभाण्याचे आवाहन केले. या बैठकीमध्ये त्रिरत्न बुद्ध विहार बचाव कृती समिती सह प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत दामोदर गायकवाड, आनंद कांबळे, विजय जाधव, किसन रोकडे, रमेश बैले ,काका मोरे तांबे एल. आर.गोडबोले, चंद्रशेखर सकपाळ सुमित वजाळे यांनी आपले मत मांडले.या बैठकीला वांद्रे विभागातील विविध राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

9 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

9 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

9 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

9 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

9 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

9 तास ago