महाराष्ट्र

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विविध साहित्य संस्था, परिवहन विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.

राज्यात मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत कार्यरत राहतील.

चालकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार असून, सुमारे चार हजार शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. प्रत्येक महिन्यातील चार शनिवार-रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. काही शिक्षक विनामूल्य सेवा देणार असून काहींना प्रति तास एक हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी आवश्यक निधीसाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पुढाकार दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाणार असून, त्यांच्या मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमतेची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.याशिवाय रिक्षा-टॅक्सी तसेच ओला, उबेर आणि रॅपिडो वाहनांवर मराठी जनजागृतीसाठी स्टिकर्स लावले जाणार असून, विशेष बॅनर्सद्वारे प्रचार मोहीमही राबविण्यात येणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

7 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

7 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

11 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

11 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

11 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

11 तास ago