महाराष्ट्र

गिग कामगारांचे हक्क, पुणे येथील MPSC च्या अपघातग्रस्त उमेदवारांची संधी आणि पुणे नाट्यगृहांची दुरवस्था

पुणे: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासास महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर निवेदनं सादर केली. या निवेदनांमध्ये अ‍ॅप आधारित गिग व प्लॅटफॉर्म सेवा क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांचे रक्षण, अपघातग्रस्त व अपंग उमेदवारांसाठी परीक्षेची विशेष संधी, आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना यांचा समावेश आहे.

१) पुण्यातील नाट्यगृहांची दुरवस्था; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

अलीकडेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे एका प्रयोगादरम्यान महिला प्रेक्षकाच्या पायावरून उंदीर गेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा संदर्भ देत, डॉ. गोऱ्हे यांनी पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील नाट्यगृहांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव, तुटलेली बैठक व्यवस्था, गळक्या छतांमुळे रंगमंचाची हानी, वीज व्यवस्थेचा धोका, आणि कीटक-उंदीर नियंत्रणाच्या अकार्यक्षमतेवर कठोर शब्दांत टीका केली.

त्या म्हणाल्या, “पुणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे केंद्र आहे. येथील नाट्यगृहे ही आपल्या संस्कृतीचा अभिमान आहेत. त्यांच्या देखभालीस तातडीने प्राधान्य दिले पाहिजे.”

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही निवेदनं प्रत्यक्षपणे सादर करताना संबंधित विभागांनी त्वरेने कृती करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री मा. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

2) एमपीएससी अपघातग्रस्त उमेदवारासाठी विशेष परीक्षेची विनंती 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा पूर्व परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या प्रशांत ब्रह्मदेव बंडगर या उमेदवारास ३१ मे रोजी भावे हायस्कूलजवळ मद्यधुंद वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात डावा पाय फ्रॅक्चर झाला. बंडगर हे आधीपासूनच डोळ्याने अपंग असून, या अपघातामुळे परीक्षेला हजर राहता आले नाही. या घटनेत इतर १० विद्यार्थी जखमी झाले असून तेही परीक्षा देऊ शकले नाहीत.

डॉ. गोऱ्हे यांनी याबाबतच्या निवेदनात “दुर्लक्षित कारणास्तव गैरहजर” मानून या उमेदवारांसाठी विशेष परीक्षा आयोजित करण्याची विनंती केली आहे. यामुळे सामाजिक न्यायाचे तत्व जपले जाईल आणि अपंग उमेदवारांचा हक्क सुरक्षित राहील, असे त्या म्हणाल्या.

३) गिग व प्लॅटफॉर्म कामगारांसाठी धोरण व कायदा तयार करण्याची मागणी

अ‍ॅपद्वारे सेवा पुरवणाऱ्या झोमॅटो, स्विगी, ओला, उबर, अर्बन कंपनी अशा अनेक प्लॅटफॉर्म्सवर काम करणाऱ्या लाखो युवक-युवतींच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत डॉ. गोऱ्हे यांनी सादर केलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र कायदा तयार करून एक त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची मागणी केली.

या मंडळात शासन, कामगार प्रतिनिधी आणि संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असावा, असे नमूद करत त्यांनी खालील उपाययोजनांची शिफारस केली:

गिग कामगारांसाठी ओळख क्रमांक रद्द करण्याची स्पष्ट प्रक्रिया

किमान वेतन, विमा, सवेतन रजा, मातृत्व/पितृत्व लाभ यांचा कायद्यात समावेश

कामाच्या ठिकाणी सुरक्षा व लैंगिक शोषणाविरोधी यंत्रणा

डेटा व अल्गोरिदममधील पारदर्शकता

महिला गिग कामगारांसाठी विशेष तक्रार निवारण यंत्रणा

कौशल्यविकास व पुनर्प्रशिक्षणाचे केंद्र

राजस्थानने या संदर्भात कायदा लागू केला असून, महाराष्ट्रानेही अशा पद्धतीचा आदर्श घालून द्यावा, यापद्धतीची अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

57 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

15 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

21 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

21 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

21 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

21 तास ago