महाराष्ट्र

रोमानिया–मिलिसाऊटी शहराच्या महापौरांची मुंबई महापौरांशी सदिच्छा भेट

मुंबई: रोमानिया – मिलिसाऊटी शहराचे महापौर वांगले कॅमेरे यांनी आज मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांची महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान दोन्ही शहरांमधील नागरी सुविधा, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिलिसाऊटी शहरातील आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली आणि कचऱ्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रकल्पांची माहिती महापौर तावडे यांनी जाणून घेतली. भविष्यात या क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.प्रारंभी महापौर रितू तावडे यांनी वांगले कॅमेरे यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत व सत्कार केला.

याप्रसंगी सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) स्वामी तसेच व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख शशी बाला उपस्थित होत्या.या सदिच्छा भेटीमुळे दोन्ही शहरांदरम्यान नागरी प्रशासन आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये सहकार्याची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago