मुंबई: मोहम्मद रफी, आशा भोसले आणि लता मंगेशकर… भारतीय संगीत जगतात या नावांनी इतिहास घडवला. हे तिन्ही गायक आपापल्या जागी महान होते, पण फार कमी लोकांना माहीत असेल की मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्यात अजिबात पटत नव्हते.
एवढेच नाही तर, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यातही वाद झाले होते. खुद्द मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. शाहीद रफी यांनी आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यावर त्यांच्या वडिलांचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.
विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शाहीद रफी म्हणाले की, आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोन्ही बहिणी माझ्या वडिलांचा हेवा करत होत्या आणि त्यामुळेच त्यांनी त्यांचे करिअर खराब केले. शाहीद रफी यांनी असाही दावा केला की, जेव्हा सर्वाधिक गाणी गाण्यासाठी त्यांच्या वडिलांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाणार होते, तेव्हाही लता मंगेशकर यांनी त्यात हस्तक्षेप केला.
लता दीदींनी अडथळा आणला
लता मंगेशकर यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक गाण्यांची नोंद कशी झाली, असे विचारले असता शाहीद रफी म्हणाले, ‘लोकांना याबद्दल माहितीच नाही. पहिले नाव माझ्या वडिलांचे (मोहम्मद रफी) आले होते, पण लता दीदी म्हणाल्या की, नाही, मी सर्वात जास्त गाणी गायली आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी माझ्या वडिलांचे नाव आधीच आले होते. त्यानंतर लता दीदींनी यात हस्तक्षेप केला आणि म्हणाल्या की मोहम्मद रफी नाही, मी जास्त गाणी गायली आहेत. त्यानंतर माझ्या वडिलांनी या गोष्टीकडे फार लक्ष दिले नाही आणि ते फक्त गात राहिले.’
आशा भोसले यांच्यावर टीका
आशा भोसले यांनी एकदा मोहम्मद रफींच्या आवाजात रेंज नाही, असे म्हटले होते. यावर शाहीद रफी म्हणाले, ‘तुम्ही विद्वान आहात, लाज बाळगा. या वयात तरी हे करू नका. मी हे त्यांना थेट सांगत आहे. माझ्या वडिलांबद्दल कोणी काही बोलल्यास मला ते सहन होत नाही. माझ्या वडिलांनी कधीही अभिनेता कोण आहे असं विचारलं नाही. ते फक्त सिच्युएशन विचारायचे. शेती चाललीये… लढाई होतेय… कव्वाली आहे… आणि तुम्ही व्हेरिएशन बद्दल बोलताय तर आवाजाची पट्टी बदलणं हेसुद्धा व्हेरिएशन आहे.’
पुढे ते म्हणाले, ‘तुम्ही म्हाताऱ्या झाल्या आहात. तुम्ही स्वत:बद्दल बोला. त्यांच्यासमोर हे बोलताना मला अजिबात संकोच वाटत नाही आणि लता दीदींच्या निधनापूर्वीच मी त्यांना हे सांगितले होते. लता दीदी म्हणाल्या होत्या की वडिलांचे करिअर उतरणीला लागले होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांची माफी मागितली होती. पण माझ्या वडिलांनी असे कधीच म्हटले नव्हते. मी तुम्हाला सांगू शकतो की लता दीदींनी असे म्हटले होते आणि दोन लोक माझ्या वडिलांकडे आले आणि त्यांना लता दीदींना माफ करण्यास सांगितले. तेव्हा अनेक नवीन गायिका पुढे येत होत्या, ज्यात त्यांची स्वतःची बहीणही होती. त्यामुळे त्या असुरक्षित झाल्या होत्या. आता तुम्हीच सांगा, कोणाचे करिअर धोक्यात होते.
नर्गिस यांच्या सांगण्यावरून माफी दिली…
शाहीद रफी यांनी हे देखील सांगितले की त्यांच्या वडिलांनी लता मंगेशकर यांच्याशी कधीही वैयक्तिकरित्या बोलले नाही. मात्र, नर्गिस आणि जयकिशन यांच्या सांगण्यावरून त्यांनी लता मंगेशकर यांना माफ केले होते. पॅचअप झाल्यानंतर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी एका शोमध्ये एकत्र परफॉर्मही केला होता. 1980 मध्ये मोहम्मद रफी यांचे निधन झाले. ते मधुमेह आणि हृदयविकाराने त्रस्त होते. 1967 मध्ये मोहम्मद रफी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…