महाराष्ट्र

मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) कार्याध्यक्षपदी सचिन चिटणीस

पत्रकार महामंडळ संकल्पक शीतल करदेकर महामंडळ गठनासाठी आमरण उपोषण करण्यास आग्रही; संस्थापक सरचिटणीस डॉ सुभाष सामंत

पुणे: मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया ( माई ) संघटनेच्या संस्थापकांची पुणे येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत राज्य कार्यकारणी सर्वानुमते निवडी करण्यात आली यावेळी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात कार्याध्यक्षपदी सचिन चिटणीस व उपाध्यक्षपदी डॉ.अब्दुल कदीर आणि सरचिटणीसपदी लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

पत्रकार महामंडळ हे आमच्या संघटनेच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या संकल्पनेतून आले आहे .त्यासाठी त्यांनी २ दिवस आमरण उपोषण केले आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार महामंडळ घोषित केले; हे महामंडळ गठित होणे, बजेट अधिवेशनात यासाठी तरतूद होणे आवश्यक आहे.त्यासाठी आमरण उपोषण करण्यासाठी त्या आग्रही आहेत, असे, संस्थापक सरचिटणीस डॉ सुभाष सामंत यांनी सांगितले.

आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम करण्यात येणार असून पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपली संघटना अग्रेसर कशी राहिल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्रातील विभागीय अध्यक्षांची व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

चेतन काशीकर – खजिनदार , शेखर धोंगडे – सहसचिव पदी निवड करण्यात आली तर मुंबई विभागीय अध्यक्ष – गणेश तळेकर ( मुंबई शहर ) व अनिल चासकर ( मुंबई उपनगर), कोकण विभागीय अध्यक्ष सुनिल कटेकर – (रायगड) व प्रवीण वाघमारे (ठाणे) मराठवाडा विभागीय अध्यक्ष – शेख मजहर (संभाजीनगर) व पुनम मिश्रा, नाशिक विभागीय अध्यक्ष – चंद्रशेखर पाटील (धुळे), अमरावती विभागीय अध्यक्ष’ सुरेंद्र आकोडे (अमरावती ), यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व संस्थापक सदस्य उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

4 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

8 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

8 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago