मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगारांना मारहाण करणे, त्यांचे पगार न देणे असे प्रकार कायमच घडत असतात. असाच एक गंभीर प्रकार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) हद्दीत घडला असुन ४० ते ५० कामगारांना एका खोलीत डांबुन ठेवत त्यांना केलेल्या कामाचे पैसे न देता त्यांना मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सुधाकर रामराव माखणे (वय ३९) सध्या (रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) मुळ (रा. वसमत आसेगाव रोड, ता. वसमत, जि. हिंगोली) यांच्या फिर्यादीवरुन चार जणांवर वेठबिगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon MIDC Police) दिलेल्या माहितीनुसार दि २५ जानेवारी २०२५ रात्री ८ ते दि १ फेब्रुवारी २०२५ रोजी ७ च्या दरम्यान वेळोवेळी ढोकसांगवी ता. शिरुर, जि. पुणे येथील एस के एच (HKH) कंपनी समोरील अभंग यांच्या खोलीत फिर्यादी तसेच फिर्यादी सोबतचे इतर कामगार यांना लेबर कॉन्ट्रॅक्टर आनंद दिगंबर वाघळकर व सुनील दिगंबर वाघळकर, कामगारांना जेवण देणारा प्रशांत श्रावण साळवे तसेच सुपरवायझर अक्षय काळे यांनी कंपनीमध्ये काम करण्यासाठी आणलेल्या कामगारांना त्यांना डांबून ठेवत धमकावुन वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्यास भाग पाडले.

 

तसेच केलेल्या कामाचे पैसे न देता कॉन्ट्रॅक्टर सुनील वाघळकर व सुपरवायझर अक्षय काळे यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसे मागितले असता त्यांनी फायबरच्या पाईपने कामगारांना पाठीत व कमरेवर मारहाण करुन दुखापत केली आहे. तसेच इतर कामगारांनाही वेळोवेळी मारहाण केली आहे. त्यामुळे रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) मध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.

 

सदर गुन्ह्यातील आरोपी आनंद वाघाळकर व प्रशांत साळवे यांना अटक करण्यात आली असुन आज (दि २) रोजी त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता दि (दि ५) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असुन इतर दोन फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

 

खोली भाड्याने देताय थोडी काळजी घ्या…

रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी, बाभुळसर खुर्द या परीसरात अनेक कामगार खोली घेऊन भाड्याने राहतात. परंतु खोलीमालक पैशाच्या लोभापायी या कामगारांची कोणतीही विचारपुस न करता किंवा भाडेकरुंची कोणतीही पार्श्वभूमी न पाहता त्यांना खोल्या भाड्याने देतात. त्यामुळे असे गंभीर प्रकार घडतात.

 

खोली मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

सदर प्रकार ज्या ठिकाणी घडला तिथे एका पत्र्याच्या शेडमधे ४० ते ५० कामगारांना डांबुन ठेवले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत असुन खोलीमालक नवनाथ अभंग याने हे शेड भाड्याने दिले होते. तिथे काही परप्रांतीय तसेच महाराष्ट्रातल्या कामगारांना मारहाण करत त्रास दिला जात होता. परंतु खोली मालकाच्या हि बाब लक्षात आली नाही का…? कि खोली मालक सुद्धा या सगळ्यात सामील होता. याचा तपासही पोलिसांनी करणे गरजेचे असुन या खोली मालकावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

Video: शिरुर तालुक्यातील कडबा पेंढी चोर झाला सीसीटीव्हीत कैद; ओळखा कोण…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago