महाराष्ट्र

सरपंचपद नडले! सरपंच आणि उपसरपंचाच्या मारहाणीत सदस्याचा मृत्यू…

जामखेड (अहमदनगर): घोडेगाव (ता. जामखेड) येथील ग्रामपंचायतीमध्ये मागील खर्चाचा हिशोब मागतो म्हणून ग्रामपंचायती मध्ये झालेल्या वादावरून शिवीगाळ करत ‘आमच्या नादी लागला तर सोडणार नाही’ असे म्हणत गंचाडी पकडून सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली. यामुळे मेंदू मध्ये रक्तस्राव झाला व उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी फिर्याद खर्डा पोलीसात दाखल करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

फिर्यादी रेखा रावसाहेब रावण (वय ५२ रा. घोडेगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा गणेश रावसाहेब रावण (वय ३२) हा ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता. तो व शरद जगताप एकाच प्रभागातून निवडून आले होते. यानंतर सरपंच पदासाठी गणेशने शरद जगताप यास मतदान केले होते. वर्षानंतर गणेशला सरपंच करायचे ठरले होते. पण एक वर्ष झाले तरी सरपंच शरद जगताप याने राजीनामा दिला नाही. यामुळे गणेश रावण व सरपंच शरद जगताप यांच्यात सतत भांडणे होत होती.

३० जून २०२३ रोजी गणेश हा सकाळी १० वाजता ग्रामपंचायत मध्ये मिटींग साठी गेला होता. दुपारी तो घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर झोपलेला दिसला त्याने जेवनही केले नव्हते याचे कारण विचारले तर त्यांने डोके दुखत असल्याचे सांगितले. डोके दुखण्याचे कारण विचारले तर त्यांने सांगितले की, ‘ग्रामपंचायत मध्ये सरपंच शरद जगताप, उपसरपंच शमशाद शौकत मुलानी ग्रामसेवक रामदास गोरे हजर होते. यावेळी मागील खर्चाचा हिशोब मागितल्यावरून सरपंच व माझी वादावादी झाली. मी घरी येत असताना घोडेगाव खुरदैठण रस्त्यावरील पुलाजवळ सरपंच शरद जगताप व शौकत सैदु मुलानी आले व मोटारसायकल आडवी लावून तु हिशोब मागतो काय म्हणत शिवीगाळ करत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही म्हणून शौकत मुलानी यांने गंचाडी पकडून हाताने कानाखाली मारहाण केली. यावेळी शरद जगताप याने हाताने पाठीमागून डोक्यावर मारहाण केली. यावेळी जालिंदर कल्याण भोंडवे हे जवळून जात असताना त्यांनी आमचे भांडण सोडवले मला झालेल्या मारहाणीमुळे माझे डोके दुखत आहे.’

यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी गणेश याला उलटी झाली. यानंतर गणेश यास जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. नंतर सीटीस्कँन करण्यात आला याचा रिपोर्ट आल्यावर नगरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. नगरला दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान २ जुलै २०२३ रोजी सकाळी ८.४८ वाजता गणेशचा मृत्यू झाला. अशी फिर्याद मयत गणेशची आई रेखा रावसाहेब रावण यांनी खर्डा पोलिसात २५ ऑगस्ट २०२३ रोजी दाखल केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

माजी सरपंचाचा साडूनेच काढला काटा; मेहुणी आणि पत्नीवरही वार…

उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…

राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू…

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

9 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago