शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

क्राईम मुख्य बातम्या

विक्री केलेल्या जमिनिची नोंद होऊ नये म्हणुण तक्रार केल्याने भाच्याने केली आत्याला मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील वडीलांच्या जमिनीमध्ये हिस्सा मिळण्यासाठी शांताबाई सोपान खामकर रा. शिनगरवाडी, टाकळी हाजी यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. कोर्टाची मनाई ऑर्डर असतानाही आरोपी रमेश राघोबा थोरात याने या गटातील काही क्षेत्राची जमिन विक्री केली होती. त्यामुळे या महिलेने या जमिन विक्रीची नोंद न होण्यासाठी मंडल अधिकारी, मलठण यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता.

सुनावणीच्या तारखेला मलठण येथे येत मंडल आधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर सदर महिलेला रमेश थोरात याने तू कशाला केस केली आहे, असे बोलून सदर महिलेचा हात पिरगाळून खाली पाडले व शिव्या देवून मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये रमेश थोरात याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्रापूर येथील प्लॉटींग व्यावसायिक असलेला माजी उपसरपंच असलेला रमेश थोरात याने काही दिवसांपुर्वी शिक्रापूर येथील तलाठी महीलेला जातीवाचक शिविगाळ करून त्यांच्या कामकाजाची कागदपत्रे ऊधळून लावत सरकारी कामात अडथळा आणला होता. या प्रकरणी ही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तो तात्पुरत्या स्वरूपात जामीनावर बाहेर असून त्याने पुन्हा जमिनीसाठी चक्क आत्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागा एन. ए. करत बिल्डींग उभ्या करून विक्री केल्या आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.