महाराष्ट्र

धक्कादायक! नदीत वाहून गेलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी गेला अन…

नागपूर: राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तर अनेक ठिकणी अजूनही मध्येच मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे पाऊस थांबला तरी नद्यांना भरपूर पाणी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात विशेषतः पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीही अनेक दुर्घटना समोर येत आहेत.

नागपूरमधूनही सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात सांड नदीमध्ये एक तरुण वाहून गेला आहे. संजय नागपूरे असं या व्यक्तीचं नाव होतं. हा तरुण पुलावरुन पायी निघाला होता. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पायी रस्ता ओलांडताना तो प्रवाहासोबत वाहून गेला. संजय ला वाचवण्यासाठी एक तरुण मदतीला धावला. मात्र प्रवाह जास्त असल्याने तोही पाण्यासोबत वाहत जाऊ लागला. परंतु, पोहता येत असल्याने त्याने कसा तरी आपला जीव वाचवला. मात्र, संजयला वाचवण्यात तो अपयशी ठरला.

सध्या संजयचा कोणताही पत्ता नसून स्थानिक आपल्या स्तरावर त्याचा शोध घेत आहे.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. यात दिसतं की संजय पाण्यासोबत वाहत जात आहे. इतक्यात एक तरुण पाण्यात उतरत संजयला वाचवण्यासाठी त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका जास्त असतो, की हे दोघंही वाहून जाऊ लागतात. यानंतर मदतीसाठी गेलेला तरुण संजयचा हात सोडून स्वतःचा जीव वाचवतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

6 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago