चंद्रपूर: जंगलचा राजा सिंह का असतो हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे त्याचं नाव ऐकूनही आपल्याला भिती वाटू शकते. पण काही जण विशेषत: तरुणी फोटोसाठी इतक्या वेड्या असतात की त्या काहीही करु शकतात.
एका प्राणीसंग्रहालयात सिंह पाहायला गेलेल्या तरुणींनी त्याला विनाकारण चिडवले. इतकेच नाही तर तो चिडल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तरुणी सिंहाला त्रास देताना दिसत आहेत. त्यामुळे वैतागलेला आणि काहीसा त्रासलेला सिंह आपल्याला दिसत आहे. अशाप्रकारे सिंहाला चिडवणे योग्य नाही.
जीन्स आणि काळा टी शर्ट घातलेली एक मुलगी काचेच्या एका बॉक्समध्ये सिंहाला पाहण्यासाठी येते. त्यानंतर तिला पाहून सिंह आपल्या पुढच्या पायांचे पंजे काचेवर घासायला लागतो. ते पाहून ही मुलगीही आपल्या हाताने सिंहासारखेच करते. आपण एखाद्या लहान मुलाला किंवा आपल्या पाळीव प्राण्याला ज्याप्रमाणे चिडवतो त्याचप्रमाणे ही मुलगी सिंहाला चिडवत असल्याने ते पाहून आपल्याला काहीसे आश्चर्य वाटते.
सिंहाला इतक्या जवळून पाहिल्यावर आपल्याला काहीशी भिती वाटू शकते. पण ही मुलगी मात्र अतिशय बिनधास्तपणे या सिंहाशी हातवारे करत खेळत असल्याचे दिसते. इतकेच नाही तर त्याच्याशी असा खेळ केल्यानंतर ती अतिशय मनसोक्तपणे हसताना दिसते. तर २ मिनीटांनी तिची एक मैत्रीण मागून आतमध्ये येते आणि त्या दोघी सिंहाच्या बाजूला फोटोसाठी पोज देतात. तर त्यांच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती या गुहेसारख्या ठिकाणातून त्यांचा फोटो काढत असल्याचे दिसते.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…