महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील बेकायदा शाळा चालवणाऱ्या संचालकांवर कारवाई करा…

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेने पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर, पालिकेकडून अनाधिकृत शाळा घोषित केल्या जातात. मात्र, या शाळांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करणे, या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे जाहीर करण्यापलिकडे शिक्षण विभागाने काहीही केले नाही.

अनधिकृत शाळांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, याकडे संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी आयुक्तांचे पत्राद्वारे लक्ष वेधले. अनधिकृत शाळांचा कारभार पालिकेच्या शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने सुरु आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अनाधिकृत शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

13 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

14 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

14 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

14 तास ago