इतर

मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या सर्व मुलांना मिळणार सोन्याची अंगठी, कुठे पहा…

चेन्नईः भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतील RSRM या सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल,’ असे मत्स्यव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी म्हटले आहे.

प्रत्येक अंगठी ही सुमारे 2 ग्रॅमची असेल, तिची किंमत सुमारे 5000 रुपयांपर्यंत असू शकते. तसेच, ही मोफत वाटली जाणारी रेवाडी नाही. तर या माध्यमाने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या बालकांचे स्वागत करणार आहोत, असे मुरुगन यांनी म्हटले आहे. या रुग्णालयात 17 सप्टेंबरला 10 ते 15 बालकांचा जन्म होऊ शकतो, असा भाजपच्या स्थानिक युनिटचा अंदाज आहे.

तामिळनाडूनत मोदींच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 720 किलो मासेही वाटण्यात येणार आहेत. हे मासे वाटण्यासाठी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा (PMMSY) उद्देश मत्स्य विक्रीस प्रोत्साहन देणे, असा आहे. यामुळे आम्ही हे पाऊल उचलत आहोत. आम्हाला माहित आहे, की पंतप्रधान मोदी हे शाकाहारी आहेत. तसेच, यावेळी ते 72 वर्षांचे होत आहेत. यामुळे आम्ही 720 हा आकडा निवडला आहे, असेही मत्स्यव्यवसाय मंत्री मुरुगन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली भाजप 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा पंधरवाडा’ साजरा करणार आहे. यादरम्यान, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांसोबतच इतरही अनेक कार्यक्रम होणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

2 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

2 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago